पान:विवेकानंद.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
महाभारत.

६५


लाच आहे. मी यम त्याला नेण्यासाठी आलो आहे." यमाच्या सांगण्या- प्रमाणें सावित्रीनें आपल्या पतीचें मस्तक खाली ठेवलें. यमानें त्याच्या प्राणाचें हरण केले व तो चालू लागला. थोड्याशा अंतरावर यम गेला इत आपल्या पाठीमागें वाळलेल्या पाचोळ्यावर कोणाचीं पावलें वाजत आहेत असें वाटून त्यानें मागे वळून पाहिले तों सावित्री त्याच्या नजरेस पडली; तेव्हां तो तिला म्हणाला, “मुली, तूं माझ्यामागें कां येतेस ? मरण कोणाला सुटले आहे काय ? ” सावित्री म्हणाली, "यमराज, मी आपल्यामागें येत नाहीं. पण पति जाईल तिकडे जाणें हें प्रत्येक पतिव्रतेचें कामच आहे. ज्या- प्रमाणें मृत्यु पावणें हा प्रत्येक देहधाऱ्याचा धर्म आहे, त्याचप्रमाणें सदोदित पतिसमागमें असणें हाही कुलांगनेचा धर्मच; नाहीं का? हा सनातनधर्म आहे. देशकालवर्तमानानें हा धर्म बाधित होत नाहीं. " या तिच्या उत्तरानें संतोष पावून यम म्हणाला, “मुली, तुला हवा तर एक वर मागून घे. पण याचा प्राण मात्र तुला प्राप्त होणार नाहीं." सावित्री म्हणाली, "भगवान् यमधर्मा, मला कांहीं वर देण्याची आपली मर्जी असेल तर माझ्या सासऱ्याला दृष्टि द्या. आणि सुख प्राप्त व्हावें हें देणें आपण मला द्यावें. ' “तथास्तु. तुझी शुभ इच्छा तृप्त होवो. " असें म्हणून यम पुढे चालू लागला. पुन्हां त्याला पूर्वी- प्रमाणेंच पावलांचा आवाज ऐकूं आला. पुन्हा मार्गे वळून तो म्हणाला, “बाळे, तूं अजूनही माझ्यामागून कां येतेस ?" सावित्रीनें उत्तर दिलें, “महाराज, मी तरी काय करूं. माझे पाय आपोआपच आपल्यामागे चालू लागतात. मागें फिरावें म्हणून मी पुष्कळ यत्न केला; पण माझें मन आणि त्याबरोबरच माझें शरीरही आपल्या मागें येतें. माझा आत्मा या देहांतून अगोदरच बाहेर गेला आहे. माझ्या पतीच्या आत्म्याहून माझा आत्मा निराळा नाहीं. त्या माझ्या आत्म्यामागें माझें शरीर जातें त्याला मी काय करूं ? " यम म्हणाला, "अहाहा ! तुझे हे शब्द ऐकून मला आनंद होतो. आणखी एखादा वर हवा तर मागून घे; पण सत्यवान मात्र तुला परत मिळणार नाहीं. " सावित्री म्हणाली, "देवा, तुझी मर्जी असेल तर माझ्या सासऱ्याचें सर्व वैभव पुन्हा प्राप्त होवो आणि तो पुन्हा राज्यासनावर बसो. " यम म्हणाला, “मुली, तुझ्या इच्छेप्रमाणें होईल. पण आतां मात्र घरीं जाहो. जिवंत मनुष्यांनीं यमाबरोबर चालू नये. ” असें म्हणून यम पुढे चालू लागला. पुन्हा त्याला पूर्वीसारखाच  स्वा. वि. खं. ३-५.