पान:विवेकानंद.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
महाभारत.

६३

हृदयांत वास करीत होती. एखादा मोठा शूर क्षत्रिय असला तरी क्षात्रदर्शक वस्तू बाहेर ठेवल्यावांचून तो आश्रमांत शिरावयाचा नाहीं. बाह्यतः तरी त्यानें शांतवृत्तीचा स्वीकार केलाच पाहिजे.
 युमत्सेन राजाच्या आश्रमांत सावित्री आली, आणि राजाच्या सत्यवान नामक पुत्राला तिनें पाहिले आणि तिचें प्रेम त्याच्यावर जडलें. त्या वेळेपर्यंत अनेक राजकुमार तिर्ने पाहिले होते, पण सत्यवानाला पाहिल्यानंतर मात्र तिचें मन तिच्या ताब्यांत राहिले नाहीं.
 आपला प्रवास संपवून सावित्री परत आली तेव्हां तिच्या पित्यानें तिळा विचारलें, “बाळे, एखाद्या राजपुत्राला तूं पसंत केलेंस का ? " सावित्रीनें होकारार्थी मान हालवितांच तिचा बाप म्हणाला, "काय त्या राजपुत्राचें नांव ? " सावित्रीनें उत्तर दिलें, "ते आतां राजपुत्र नाहीत. त्यांच्या वडिलांचें नांव द्युमत्सेन असे असून त्यांच्या शत्रूंनीं त्यांचे राज्य हिरावून घेतले आहे. त्यामुळे आपल्या पुत्रासह द्युमत्सेनांनीं अरण्यवास पतकरला आहे. युमत्से- नांचा पुत्र हल्लीं कंदमुळे आणून आपल्या मातापित्यांचें पोषण करीत असतो."  त्यांचें भाषण याप्रमाणें चाललें आहे तो नारदमुनि तेथें आले. राजानें ही हकीगत मुनींच्या कानावर घालून त्यांचा सल्ला विचारला. नारदमुनि म्हणाले, "राजा, आजपासून बारा महिन्यांनीं हा राजपुत्र मरण पावणार आहे. तुझ्या मुलीनें त्याला पसंत केलें ही फारच वाईट गोष्ट झाली आहे. " राजानें हें मुनीचें म्हणणें सावित्रीला कळविले आणि म्हटलें, “बाळे, विचार कर. अशा अल्पायु राजपुत्राशीं विवाह करून आपल्या जन्माचें तूं मातेरें करून घेणार काय? त्याजबद्दलचा आतां विचारच तूं करूं नको.”. सावित्री ह्मणाली, “ त्यांना मीं मनानें वरिले आहे. आतां दुसऱ्याशीं विवाह करून मी पाति व्रत्यभंगाचें पातक कसें आचरूं ? कुमारिकेनें पसंती एकदांच करावयाची असते. ती पसंती होऊन चुकल्यावर पुन्हां तिनें निराळा विचार करणे सुद्धां पापाचरणच आहे. " सावित्रीचा निश्चय दृढ आहे असें पाहून तिच्या बापानें तिचें लग्न सत्यवानाशीं करून दिलें. लग्न झाल्याबरोबर सावित्री अरण्यांत राहावयास गेली. सत्यवान कधीं मृत्यु पावणार हे सावित्रीला अगोदर कळले होतें; पण त्याबद्दल तिनें कोणाजवळही उच्चार केला नव्हता. ती माहिती तिनें अत्यंत गुप्त राखली होती. कंदमुळे आणण्यासाठी सत्यवान घनदाट अर