पान:विवेकानंद.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६०
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[ तृतीय


केलें. यज्ञसमारंभाकरितां धृतराष्ट्रराजाला व त्याच्या पुत्रांनाही बोलाविलें होतें. समारंभाच्या समाप्तीच्या वेळीं राजा युधिष्टिराला सार्वभौमत्वाचा अभिषेक झाला. याचवेळीं भावी महायुद्धाचें बीज पेरलें गेलें. यज्ञाचा तो अपूर्व समा रंभ पाहून दुर्योधन मत्सराने जळूं लागला. पांडवांचें वैभव आणि युधिष्ठि राचें सार्वभौमत्व त्याला सहन झालें नाहीं. पांडवांना कोणत्यातरी उपायानें गोत्यांत आणून त्यांचें वैभव हरण करण्याचा त्यानें निश्चय केला; कारण युद्धांत त्यांना जिंकणे शक्य नाहीं, ही गोष्ट त्याला पक्की ठाऊक होती. याक रितां कांहीं कपट योजण्याचा निश्चय त्यानें केला. युधिष्ठिर राजाला द्यूत खेळ - ण्याचा नाद होता. शकुनीबरोबर द्यूत खेळण्यासाठी दुर्योधनानें त्याला पाचारण केलें. शकुनि हा दुर्योधनाचा मामा असून अत्यंत दुष्ट व कुटिल नीतीचा पुतळा म्हणून प्रसिद्ध होता. भारतीय महायुद्धांत जो रक्ताचा पाऊस पडला आणि जी भयंकर प्राणहानी झाली तिचें पातक याच कपटपटूच्या माथीं आहे. असो. क्षत्रियाला युद्धाकरितां अथवा द्यूत खेळण्याकरितां कोणीं पाचा- रण केलें असतां त्यानें तें नाकारलें तर त्याच्या क्षत्रियत्वास तें लांछन आहे असे त्या काळीं समजले जात असे. युधिष्टिर राजा हा सर्व गुणांचा अलंकार होता, असें महाभारतांत म्हटले आहे. सर्व सज्जनांचा तो आदर्श होता. असें असतांही द्यूताकरितां दुर्योधनानें केलेले पाचारण त्यास मान्य करावे लागले. शकुनीनें छूत खेळण्याकरितां जे फांसे तयार केले होते त्यांत कपट होतें. युधिष्ठिराला ही गोष्ट ठाऊक नव्हती. यामुळे प्रत्येक डावांत त्याला हार खावी लागली. याप्रमाणें प्रत्येक डावाच्या वेळी पण लावतां लावतां शकुनीनें त्याचें सर्वस्व हरण केलें. शेवटीं आपण स्वतः, आपले बंधू व द्रौपदी या सर्वाना त्यानें पणाला लाविलें. या डावांतही त्याला हार खावी लागली. त्यांचें सर्व वित्त कौरवांचें झालें. एवढेच नव्हे तर त्यांचें जीवितही कौरवांच्या हातीं गेलें. त्या नीचांनीं बिचाऱ्या पांडवांचा अनेक प्रकारें उपहास केला. द्रौपदीचा जो अमानुष छळ त्यांनी केला, त्यायोगें दगडालाही पाझर फुटला असता. शेवटीं आंधळ्या धृतराष्ट्राच्या मध्यस्थीनें ते मुक्त झाले व त्यांनी आपल्या घरीं जाऊन राज्य करावें असें ठरलें, पण दुर्योधनाचे समाधान एवढ्यानें झालें नाहीं. त्यानें आणखी एक डाव खेळण्यास युधिष्ठिराला आव्हान केलें. या डावांत जो कोणी हार खाईल त्यानें बारा वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास