पान:विवेकानंद.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
महाभारत.

५५


 एका चक्रवर्ती राजाचे दोन पुत्र होते. वडील पुत्राचे नांव धृतराष्ट्र असे असून धाकट्याचे नांव पंड असे होते. धृतराष्ट्र हा जन्मतःच अंध होता. आंधळा, पांगळा, कमी अवयवाचा, क्षयरोगी अथवा दुस-या कसल्याही दुर्धर रोगाने ग्रस्त असा पुत्र वारस होऊ शकत नाही, असा हिंदूंचा कायदा आहे. अशा प्रकारचा पुत्र फक्त पोटगी पुरताच वारस समजला जातो. या कारणामुळे धृतराष्ट्राला सिंहासन मिळाले नाही. त्याचा वडीलपणाचा हक्क बाजूस राहून पंड सिंहासनारूढ झाला.
 धृतराष्ट्राला शंभर पुत्र असून पंडूला पांच पुत्र होते. पंडराजा तरुण असतांच मृत्यु पावला. यामुळे धृतराष्ट्र कुरुवंशाचा मुख्य म्हणून राजपदारूढ झाला व त्याने आपल्या पुत्रांबरोबरच पंडुपुत्रांचेही लालनपालन केले. ते सर्व योग्य वयाचे होतांच त्यांस द्रोण गुरूंच्या हवाली करण्यांत आले. द्रोण हे वर्णाने ब्राह्मण असून क्षात्रविद्या त्यांस अवगत होती. द्रोणांनी या राजपुत्रांस त्यांच्या दर्जाला व वर्गाला उचित अशा प्रकारच्या शस्त्रास्त्रवियेंत निपुण केलें. अध्ययन समाप्त झाल्यानंतर धृतराष्ट्राने युधिष्ठिरास राज्यासनावर बसविलें. युधिष्ठिर हा पंडराजाचा वडील मुलगा. युधिष्ठिराच्या आंगचे अतुल सद्भुण आणि त्याच्या बंधूंचे शौर्य व निष्ठा हीं पाहून धृतराष्ट्राच्या अंतःकरणांत मत्सराने प्रवेश केला. दुर्योधन नांवाच्या आपल्या वडील मुलाच्या सांगण्यावरून धृतराष्ट्रानें कांहीं उत्सवानिमित्त पांडवांची रवानगी वारणावताला करून दिली. त्या गांवीं पांडवांस राहण्याकरितां ह्मणून दुर्योधनाने एक गृह तयार करविले होते. हें घर लाख, राळ आणि ताग इत्यादि ज्वालाग्राही पदाथचे तयार केले होते. विदुर या नांवाचा धृतराष्ट्राचा एक सावत्र भाऊ होता. हा अत्यंत सुशील ह्मणून प्रसिद्ध होता. लाक्षागृहाबद्दलची बातमी विदुरास समजतांच त्याच्या मनांत दुर्योधनाविषयीं प्रबळ शंका उत्पन्न झाली, आणि त्याने पांडवांस त्याबद्दल आगाऊ सूचना देऊन ठेवली. विदुराच्या सूचनेप्रमाणे पांडवही सावध होऊन त्यांनी त्या गृहांतून बाहेर पडण्याकरितां एक भुयार तयार करून ठेविलें. पांडव त्या गृहांत जाऊन राहिल्यावर एके दिवशी त्याला कौरवांच्या पक्षाच्या एका मनुष्यानें आग लावली. सर्व घर जळून भस्म झालेले पाहतांच कौरवांना अत्यंत हर्ष झाला. आपल्या मार्गातील सर्व कांटे उपटले गेले असे त्यांस वाटले. त्यानंतर त्यांनी लवकरच युधिष्ठिराचे राज्यपद बळ