पान:विवेकानंद.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
रामायण.

५३


पाहिजेत असे नाहीं. हिंदुस्थानाचे काय अथवा तुमचे काय, साध्य एकच आहे. यासाठी आपणा दोघांचे साध्य एकच आहे ही गोष्ट आह्मांस पटली. ते तुह्मीं आपल्या विशिष्ट मार्गाने साध्य करा. ईश्वर तुह्मांला यश देवो.' असा निरोप आर्यभूमीला आपण पाठवाल अशी मला आशा आहे.
आपले आदर्श निरनिराळे असले तरी साध्य एकच आहे व भेद दिसतो तो केवळ दृष्टिभ्रम आहे, एवढाच निरोप पूर्व आणि पश्चिम यांस पोहचविण्याचे कार्य देहपातापर्यंत मला करावयाचे आहे. अनेक प्रकारचे व्यूह आणि चक्रे यांच्या गर्दीतून आपणांस आपला मार्ग काढावयाचा आहे. आपण दोघेही वाटसरू आहों. याकरितां एकमेकांचे हित चिंतणे हेच आपले कर्तव्य आहे.