पान:विवेकानंद.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५२
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय

समजून तिनें केलें. तिला वनवास प्राप्त व्हावा ही केवढ्या मोठ्या अन्या- याची गोष्ट आहे बरें ! पण अशा प्रसंगी सुद्धां क्रोध, असूयादि विकार तिला स्पर्श करूं शकले नाहीत. प्रतिकार करण्याची इच्छा सुद्धां तिला झाली नाहीं.. आर्याचा हाच आदर्श आहे! हेंच त्यांचें त्रीदवाक्य आहे ! भगवान् बुद्ध ह्मणतात, “जर एखाद्यानें तुझांला कष्ट दिले आणि तुह्मीं त्याजवर सूड उग-- विला, तर तुमचे स्वतःचे कष्ट कमी झाले असें होत नाहीं; तर त्यामुळे जगांत दुष्टपणा मात्र अधिक वाढतो." सीता ही खरी आर्य स्त्री होती.. दुःखाला प्रतिदुःख तिनें कधींही दिलें नाहीं.
 पाश्चात्यांचा आदर्श आणि पौर्वात्यांचा आदर्श हे एकमेकांहून अत्यंत भिन्न आहेत. यांत खरा कोणता हें कोणी सांगावें ? आपल्या सामर्थ्याचा प्रत्यय प्रत्यक्ष कृतीनें दाखविणें हें चांगलें कीं संकरें सोसून गुप्त धैर्य धारण करणें अधिक चांगलें, याचें उत्तर कोणी द्यावें ? दुःखाचा प्रतिकार करून त्याचा आवेग कमी करणें पाश्चात्यांस वरें वाटतें. उलटपक्षी आर्यांचें ह्मणणें अर्से आहे कीं दुःख सोसूनच आह्मी तें समूळ नष्ट करतों; इतकेंच नाहीं, तर आज दुःखरूप वाटणाऱ्या गोष्टी सोशिकपणामुळे आह्मांस आनंददायी होऊन बसतात. हे दोन्ही आदर्श मोठे आहेत असे आपण ह्मणूंया. यांपैकी अखेर कोण मारील हे कोणी सांगावें ? मानवकुलाचें खरें कल्याण करण्याचें सामर्थ्य कोणत्या आदर्शात आहे, हे सांगण्याचे सामर्थ्य आपणांस नाहीं. मनुष्यमा- त्रांत आढळून येणारी पशुवृत्ति नाहींशी करण्याचें यश कोणता आदर्श संपा- दील हे सांगणें आपल्या अधिकाराबाहेरचें आहे. एकसारखें कर्म करून पशुवृत्ति नाहींशी होईल की कष्ट सोसण्याची शक्ति वाढवून ती नाहींशी होईल, हें कोड़ें उकलण्याची खटपट करणें आजच्या स्थितींत तरी निष्फळ आहे.
 या प्रश्नांची उत्तरें देणारा कोणी येईल तेव्हां येवो. पण तोपर्यंत एकमे- कांचे आदर्श पूर्ववत् राखण्याचें काम तरी आपण करूं या. त्यांचा नाश होणार नाहीं अशी खबरदारी आपण घेऊंया. जगांत वाईट ह्मणून जें कांहीं असेल त्याचें समूळ उच्चाटन करावयाचें हा आपणा दोघांचाही उद्देश आहे. हें कार्य तुली आपल्या विशिष्ट मार्गानें करीत आहां; तसेंच तें आमच्या मार्गाने आह्मांस करूं द्या. पाश्चात्यांनी आमच्या मार्गाचा अंगिकार करावा असें माझें सांगणें नाहीं. साध्य एकच असले ह्मणून साधनें एकाच प्रकारची असली