पान:विवेकानंद.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४८
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


रावणास जिंकून त्याचा वध केला, व त्याची राजधानी हस्तगत केली. या राजधानींत कित्येक मोठमोठाले राजवाडे असून त्यांचे सर्व सामान सोन्याचे होते. मी लंकेंत गेलो होतो असे खेड्यापाड्यांतील लोकांस सांगितले, तेव्हां तेथील घरे सोन्याची आहेत काय असा प्रश्न त्यांनी केला. असो. रावणाची राजधानी याप्रमाणे हस्तगत केल्यानंतर रावणाचा बिभीषण नांवाचा एक भाऊ होता त्यास रामाने तेथील गादीवर बसविले. या बिभीषणाने युद्धाचे वेळी रामाला मोठी मदत केली होती.
 नंतर सीतेला बरोबर घेऊन राम आपल्या अनुयायांसह लंका सोडून परत आला. वनवासाची चौदा वर्षे संपूर्ण झाली तेव्हां रामाचा धाकटा भाऊ भरत त्याला येऊन भेटला व दशरथ मृत्यु पावल्याचे वृत्त त्याला कळवून राज्याचा स्वीकार करण्याविषयी तो रामाला पुनःपुनः सांगू लागला. राम वनवासांत असतांही भरताने सिंहासनाचा स्वीकार केला नव्हता. त्यावेळी रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून तो स्वतः प्रतिनिधि ह्मणून कारभार पाहत होता. भरताच्या आग्रहावरून राम अयोध्येला आला व त्याच्या आणि प्रजाजनांच्या संमतीनें तो सिंहासनारूढ झाला. कांही दिवस गेल्यानंतर सीतेच्या पवित्रतेबद्दल लोकांत कुजबुज सुरू झाली. रावणाच्या घरी असतां ती शुद्ध राहिली याबद्दल तिने दिव्य करून खात्री केली पाहिजे असे लोक ह्मणू लागले. राम ह्मणाला, “ सीता ह्मणजे पातिव्रत्याची केवळ मूर्ति. तिला दिव्य कशाला पाहिजे?" परंतु लोक अगदीं हट्टास पेटून तिने दिव्य केले पाहिजे असे ह्मणू लागले. प्रजाजनांचा संतोष राखणे हा रामाचा बाणा होता. त्यानेही लोकांच्या ह्मणण्याप्रमाणे एक अग्निकुंड तयार करवून त्यांत अग्नि पेटविला, व सीतेने त्यांत उडी टाकली. सीता नष्ट झाली असे वाटून रामाचे अंतःकरण तळमळू लागले; इतक्यांत सिंहासनावर बसलेल्या सीतेला घेऊन अग्निदेव स्वतः प्रगट झाला. हे दिव्य पाहून सर्व लोक अत्यंत आनंदित झाले व सर्व राज्यभर लोक सीतेला धन्यवाद देऊ लागले.
 रामाने आपणास राज्याभिषेक करून घेतला त्यावेळी त्यावेळच्या रीतीप्रमाणे त्याने राज्यशासनाच्या बाबतींत कांहीं शपथा घेतल्या होत्या. प्रजाजनांचा संतोष राखणें हें राजाचे पहिले काम आहे असा समज त्यावेळीं होता. राजेलोकही लोकमतास अत्यंत मान देऊन स्वतःस प्रजेचे नोकर समजत