पान:विवेकानंद.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
रामायण.

४७


सहन झाला नसता. तिने आपल्या अंगावरील एक भूषण काढून ते हनुमानाजवळ दिले व ते घेऊन तो परत आला.
 हनुमानाकडून सर्व हकीगत ऐकून घेतल्यानंतर रामाने मोठे सैन्य जमा केलें; व कुच करून तो दक्षिणेकडे जावयास निघाला, व समुद्रापर्यंत आला. त्यानंतर लंकेच्या किनाच्यापर्यंत एक मोठा पूल बांधिला. त्याचे सेतुबंध असे नांव आजपर्यंत चालत आहे. अगदी ओटीच्या वेळी हिंदुस्थानाच्या किनायावरून लंकेच्या किना-यापर्यंत मध्यंतरीं वाळूचे बांध अद्यापिही दिसतात आणि त्यांवरून लंकेपर्यंत जाता येते.
 राम हा परमेश्वराचा अवतार होता असा आमचा समज आहे. आम्हां हिंदु लोकांच्या समजाप्रमाणे राम हा ईश्वराचा सातवा अवतार होय. राम अवतारी होता ह्मणूनच त्याच्या हातून एवढी महत्कार्ये घडली असे आह्मीं समजतो.
 रामाच्या पक्षाचे कित्येक राक्षस आणि वानर यांनी मोठमोठाल्या टेकड्या खणून काढून समुद्रांत घातल्या व प्रचंड वृक्ष आणि धोंडे यांचे ढीग त्यावर घातले. अशा रीतीनें लंकेस जाण्याकरितां त्यांनी वाट तयार केली. हें पुलाचे काम चालू असतां एक लहान खार वाळूत प्रथम लोळून मग पुलाच्या जागी जाऊन आपलें आंग झाडीत असे. अशा रीतीने पुलाला भरणी घालण्याचे काम ती करीत होती. हे तिचे कृत्य पाहून वानरांस हंसू कोसळले. मोठमोठे डोंगर आणि अरण्यांचीं अरण्ये जेथे गडप होत होती, त्या ठिकाण एक खार आपलें आंग झाडून त्यांतून पडणाच्या वाळूने भर घालीत होती ! हा देखावा पाहून कित्येक वानर एकसारखे हंसतच सुटले. रामानें तें खारीचे कृत्य पाहिले तेव्हां तो ह्मणाला, “त्या लहानग्या खारीची धन्य आहे. आपल्याच्याने होईल तितकेच काम ती मन लावून करीत आहे. यासाठी मोठमोठ्या बलाढ्य वानरांइतकेच तिचे थोरपण आहे यांत किमपि शंका नाहीं. " असे ह्मणून त्याने तिच्या पाठीवरून आपला हात फिरविला. त्याच्या खुणा अद्यापिही खारीच्या पाठीवर पट्यांच्या रूपाने राहिल्या आहेत. - पुलाचे काम पुरे झाल्याबरोबर वानरांचे सर्व सैन्य घेऊन राम आणि लक्ष्मण लंकेवर चाल करून गेले. यानंतर कित्येक महिनेपर्यंत घनघोर युद्ध सुरू होते, व त्यांत रक्ताच्या नद्या वाहिल्या असे वर्णन आहे. रामाने शेवटी