पान:विवेकानंद.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड.]

रामायण.

३९

  हीं उत्तरें ऐकून त्या बिचाया लुटारूचे डोळे खाड्कन उघडले. ज्यांच्यासाठी आपण वाटमान्याचे पापकर्म केले ती आपली सोयरींधायरी, खुद्द आईबापही-आपल्या पापांत वांटेकरी होत नाहीत हे पाहून त्याला दुनियेची रीत पूर्णपणे कळून चुकली. ज्या ठिकाणी नारदमुनींस त्याने बांधून ठेविले होते, तेथे तो परत आला आणि मुनींस मुक्त करून त्याने त्यांजपुढे साष्टांग दंडवत घातलें, आणि घरी घडलेली सर्व हकीगत त्यांस सांगून तो म्हणाला, “मुनिमहाराज, आतां या संसाराच्या तापत्रयांतून माझी सुटका करा. मी आतां यापुढे काय | करावे याचा मला उपदेश करा. मुनि म्हणाले, “आतां हा वाटमाच्याचा धंदा सोड. तुझ्या कुटुंबांतील मनुष्यांचे प्रेम तुजवर कितपत आहे हे आतां तुला कळून चुकले आहे. “जन में सुखाचे दिल्याघेतल्याचें । बा अंतकालींचें नाहीं कोणी ॥' हे लक्ष्यांत ठेव. जोंवर आपणाजवळ थोडीफार संपत्ति असते, तोंवर प्रेम प्रेम म्हणून अनेक लोक आपल्याभोंवतीं गोळा होतात; पण आपली थैली रिकामी झाल्याबरोबर आपल्याजवळ माशी सुद्धा उभी रहावयाची नाही. यासाठी असल्या पिशुनांची संगति सोडून दे; आणि जो तुझ्याबरोबर सर्वत्र आणि सर्वकाळ असतो आणि तुझ्या वयावाईट वेळीही तुला मोकलित नाही, त्याची संगत धर. त्याच्याबद्दलचे प्रेम हेच खरोखर प्रेम या नांवास पात्र आहे. ते प्रेम मात्र तुला अधोगतीस जाऊ देणार नाही. जगांत तेच प्रेम मात्र निरपेक्ष आहे. त्या प्रेमांत स्वार्थाचा लवलेशही नाहीं."
 असा उपदेश करून नारदमुनींनी त्याला राममंत्राचा उपदेश केला. तो लुटारूही त्या दिवसापासून आपला धंदा सोडून देऊन अरण्यांत निघून गेला. तेथे एकांतस्थलीं तो चिंतन आणि जप करू लागला. शेवटी त्याची वृत्ति इतकी तन्मय झाली की तो देहभान विसरला. अशा स्थितीत तो असतां मुंग्यांनी त्याच्या शरिरावर वारूळ बांधले, तरी त्याच्या चित्ताची एकाग्रता बालाग्रही ढळली नाहीं. पुढे कांही दिवस लोटल्यानंतर देववाणी झाली कीं “अहो सिद्ध, उठा." या ध्वनीनें तो एकदम जागा झाला आणि म्हणाला, * सिद्ध ? छे छे, मी सिद्ध कशाचा ? मी तर वाटमारया आहे. पुन्हा वाणी झाली, “तू वाटमाच्या नाहीस. तू जीवन्मुक्त सिद्ध पुरुष आहेस. मुंग्यांनी तुझ्या देहाभोंवतीं वारूळ बांधलें तरीसुद्धा तुझी वृत्ति ईशचिंतनांतून भ्रष्ट झाली नाही. या तुझ्या तपाच्या योगाने तुझे मागील पाप भस्म झाले आहे.