पान:विवेकानंद.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३८

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[ तृतीय

तेव्हां नारदमुनि ह्मणाले, “अरे, कोणाहि मनुष्यास लुटणे अथवा त्यांचा जीव घेणे हे महत्पाप आहे; तू हें पापकर्म का करतोस?" लुटारू ह्मणाला, “माझ्या बायकापोरांचे पोषण करावयाला पैसा नको काय? तो मी याच रीतीने मिळवीत असतो. मुनींनी विचारले, “अशा रीतीने मिळविलेल्या पैशाचा उपभोग तीं घेतात; पण त्यापासून प्राप्त होणा-या पापाचा वाटाही ती घेतील काय ?" वाटमान्याने उत्तर दिले, “होय. ती अवश्य घेतील, अशी माझी खात्री आहे. मुनि म्हणाले, “तर मग या झाडाशीं मला बांधून ठेवून तू घरी जा आणि आपल्या माणसांस याबद्दल विचारून ये. तुझ्या पापांतही ती वांटेकरी होतील की नाही याची चौकशी कर.' मुनींनी सांगितल्याप्रमाणे तो वाटमाच्या आपल्या घरी गेला व प्रथम आपल्या बापाला भेटून म्हणाला, * बाबा, मी कुटुंबपोषण कोणत्या धंद्यावर करतों में तुम्हाला ठाऊक आहे काय ?" बाप म्हणाला, “नाहीं. ती चौकशी मला कशाला हवी ?” लुटारू म्हणाला, “मी वाटमान्याचा धंदा करतो. रस्त्यांतील एकट्यादुकट्या वाटस रास मी लुबाडून पैसा मिळवितों.” बाप म्हणाला, “काय ? तू असलें भयंकर कर्म करतोस ? मांगा, चल चालता हौ येथून." लुटारू आपल्या आईकडे जाऊन तिला म्हणाला, “आई, तुम्हा सर्वांचा चरितार्थ मी कसा चालवितों में तुला ठाऊक आहे का ?" आईने नकारार्थी उत्तर देतांच चोर म्हणाला, * वाटसरांस लुटून आणि त्यांचा जीव घेऊन मी कुटुंबपोषण करतो." आई म्हणाली, “काय भयंकर कर्म हें !" लुटारूने विचारले, “आई, माझ्या या पापाची वांटेकरीण तू होशील का ?" आईने उत्तर दिले, “मी तुझ्या पापाचा वांटा कां घ्यावा ? वाईट काम करायला तुला मी सांगितलें नाहीं; अथवा मी स्वतःही केले नाहीं." हे उत्तर ऐकून घेऊन तो आपल्या बायकोकडे जाऊन म्हणाला, “तुम्हा सर्वांच्या पोटाला घालण्याकरितां लागणारा पैसा मी कसा मिळवितों याची तुला माहिती आहे ?" तिनेही नकारार्थी उत्तर दिले; तेव्हां तो म्हणाला, “मी वाटमान्याचा धंदा करतो. आज कित्येक वर्षे मी वाटसरांस लुटीत असतो. तुम्ही जे अन्न खातां तें मीं अशाच रीतीने आजपर्यंत मिळवीत आलो आहे. आता मला सांग बरें, या माझ्या पापाचाही वांटा तू घेशील कीं नाहीं ?" स्त्री म्हणाली, “ कधीच नाही. तुम्ही यजमान आहां. भल्याबुच्या रीतीने माझा सांभाळ करणे तुमचे कामच आहे."