पान:विवेकानंद.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



रामायण.

 फार जुनी अशी दोन वीररसप्रधान काव्यें संस्कृत भाषेत आहेत. संस्कृतांत दुसरींहि वीररसप्रधान काव्ये शेंकड आहेत; पण ही दोन विशेष महत्त्वाची आहेत. संस्कृत भाषा प्रचारांतून गेल्यास आज दोन हजारांवर वर्षे लोटून गेली आहेत; पण पुष्कळ संस्कृत साहित्य आजतागाईत राहिले आहे. रामायण आणि महाभारत या दोन सुप्रसिद्ध काव्यांबद्दल थोडीशी माहिती आज आपणांस मला सांगावयाची आहे. आर्यांच्या चालीरीती, राहणी, त्यांची संस्कृति आणि त्या वेळची लोकस्थिति यांजबद्दल पुष्कळ माहिती या काव्यांवरून होण्यासारखी आहे. या दोन काव्यांपैकी रामायण में अधिक जुनेंसर्वांत जुनें-काव्य आहे. यांत श्रीरामचरिताचे वर्णन आहे. यापूर्वीची अशीही कांहीं काव्यें संस्कृतांत आहेत. खुद्द वेद हेच एक प्रकारच्या विशेष छंदांत रचिले आहेत; पण रामायण हेच सर्वत्र आद्यकाव्य ह्मणून समजले जाते. | वाल्मिकि या नांवाचा ऋषि या काव्याचा कर्ता आहे. यानंतरही दुसरी कित्येक काव्ये या जुन्या कवीच्या नांवावर दडपली गेली; आणि पुढे पुढे तर ज्यांच्याशी त्याचा यत्किंचितही संबंध नव्हता, अशा कवितांचे कर्तृत्व याच्या गळी बांधण्याची सामान्य रुढीच पडली. या कवीचा नव्हे असा कांहीं प्रक्षिप्त भागही या काव्यांत असेल; पण तसे असले तरी त्याच्या सुंदर रचनेत कांहीं उणीव आलेली नसून त्याच्या योग्यतेचे असे दुसरें एकही काव्य जगांतील भाषांत नाहीं.
 आर्यावर्तात एक तरुण पुरुष पूर्वकाळीं होऊन गेला. लोकमान्य असे कुटुंबपोषणाचे असे एकही साधन त्याला उपलब्ध नव्हते. शरिरानें तो धट्टाकट्टा आणि चपळ असल्यामुळे शेवटीं तो वाटमान्याचा धंदा करू लागला. एकटादुकटा वाटसरू गांठून त्याला लुबाडावे आणि या कर्मावर प्राप्त होणा-या पैशाने स्वतःची मातापितरें, स्त्री आणि मुले यांचे पोषण करावे असा त्याचा जीवनक्रम सुरू झाला. कित्येक वर्षांपर्यंत त्याचा हा धंदा अबाधित चालला असतां एके दिवशीं नारदमुनींची व त्याची रस्त्यांत गांठ पडली. आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे त्याने मुनींवरही हल्ला केला व त्यांजजवळील चीजवस्त तो मागू लागला.