पान:विवेकानंद.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३६

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय

पारिभाषिक संज्ञा प्राप्त होते. प्रथम देवदेवतांच्या शोधास आरंभ होतो आणि हा शोध वाढत वाढत सर्व विश्वाच्या मुळाशी जातो. " सर्वत्र जें कांहीं भरले आहे ते वास्तविक एकरूपच आहे आणि जे जाणळे असतां सर्व कांहीं जाणले जातें" हा वेदान्तांतील शेवटचा सिद्धांत होय. यज्ञात्वा नेह भूयोन्यज्ञातव्यमवशिष्यते ।