पान:विवेकानंद.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३२

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय

प्रथम लावला होता. ते सामान्य बुद्धीचे पुरुष असते तर ते कदाचित् येथेच थांबले असते. सामान्य बुद्धीचे पुरुष विचार करता करता थकून याच मुक्कामावर विश्रांति घेत असल्याचे आपणांस नेहमी आढळून येते. आजपर्यंत इतर देशांत असाच प्रकार घडून आला असल्याचे आढळून येते. इतर देशांतील बुद्धिमान् पुरुषांनी हा मुक्काम उल्लंघून पुढे जाण्याचा यत्न केला. या मुक्कामावरच स्वस्थ बसून राहण्याचे त्यांच्या तरलबुद्धीस रुचलें नाहीं; पण त्यांच्या भोंवतालचा सामान्य लौकसमूह अजाण असल्यामळे, त्याने या पंडितांचा हिरमोड करून त्यांस पुढे जाऊ दिले नाहीं; आणि यामुळे ते देश, धर्मज्ञानाच्या बाबतींत फारच मागसले; पण जगाच्या सुदैवाने आर्यक्रऋषिवर्ग असल्या प्रकारच्या अडथळ्यांस भीक घालण्याइतका कमकुवत नव्हता. या विश्वाच्या कोड्याचा समाधानकारक उलगडा करण्याचा निश्चय त्यांनी केला होता. बाह्यसृष्टीचा विचार कितीही केला तरी या कोड्याचा उलगडा होणे नाही असा त्यांच्या बुद्धीचा निश्चय झाल्याबरोबर ते तेथेच न थांबतां अंतःसृष्ठीकडे वळले. आपणांस जगाचे जे कांहीं ज्ञान होते, ते आपल्या चक्षुरादि बायेंद्रियांनीं होत नाही, ही गोष्ट अंतःसृष्टीच्या अभ्यासाबरोबर प्रथम त्यांच्या ध्यानी आली. इंद्रियद्वारा भासमान् होणा-या सृष्टीच्या अभ्यासाने धर्मज्ञान आपणांस होणार नाहीं अशी त्यांची खात्री झाली. धर्मज्ञान प्राप्त होण्यास उणीव कशाची आहे याचा विचार ते करू लागले. ही उणीव अंतर्बाह्य अशा दोन प्रकारची आहे, ही गोष्ट त्यांच्या लक्ष्यांत आली. इंद्रियद्वारा प्राप्त होणा-या संज्ञांच्या योगाने धर्मज्ञान तुह्मांस होणार नाहीं. नुसते यज्ञयाग करून प्राप्त होणारे ज्ञान केवळ जडविषयांचे ज्ञान आहे. जडविषयांच्या ज्ञानाने या विश्वाचे कारण सांपडणार नाहीं. जडविषयांपलीकडे असलेल्या पुरुषाची भेट मी घेतली आहे.” असे एक ऋषिवचन आहे.

  अध्यात्मज्ञानाची वाढ जसजशी होत गेली, तसतशी तिजबरोबर दुसच्याही एका गोष्टीची वाढ झाली आहे; पण तिजसंबंधाने केवळ नामनिर्देशच मी आज करणार आहे; कारण त्या गोष्टीचा आपल्या प्रस्तुतच्या विषयाशी फारसा संबंध नाहीं. यज्ञयागादि बाह्य उपकरणांची वाढही धर्मज्ञानाच्या वाढीबरोबरच झाली आहे. एकीकडे धर्मकल्पनांची वाढ गणितश्रेढीने होत असतां त्याच वेळी दुस-या बाजूस यज्ञयागादि बाह्यविधींची वाढ भूमितिश्रेढीने होत होती. कांहीं