पान:विवेकानंद.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड ]

श्रुतींतील तत्त्वज्ञानाची उत्क्रांति.

३१

आतां या कोड्याचे समाधानकारक उत्तर कोठून मिळणार? आर्यतत्त्ववेत्यांचे येथवरचे सर्व प्रयत्न बाह्यवर्ती होते. या विश्वांतील वस्तुसमूहापैकी एखाद्याकडून तरी समाधानकारक उत्तर मिळेल अशी अपेक्षा त्यांस होती. सूर्य, चंद्र, आणि तारे यांजपासून तों विश्वांतील क्षुल्लक पदार्थांपर्यंत सर्वांची चांचणी त्यांनी घेतली; पण या सर्वांनी एकच उत्तर दिले. “आमचा नियंता आमच्या बाहेर कोठे तरी आहे, हेच त्यांचे उत्तर. याहून अधिक समाधानकारक असे उत्तर त्यांस मिळाले नाही. हें विश्व करणारा कोणी तरी आहे असे मानले तर एखाद्या कारागिराची कल्पना मनांत येते. एखाद्या कारागिराने एखाद्या इमारतीचा नकाशा प्रथम चित्तांत तयार करावा आणि नंतर त्या चित्राबरहुकूम इमारत रचावी तशीच ही विश्वरचना झाली आहे काय? बाह्यजगांत कितीहि भटकलें तरी वरील प्रश्नास 'होय' असेच उत्तर येते; पण हैं। उत्तर तर्कशास्त्राच्या कसोटीस उतरणारे नाहीं. या उत्तराने फार तर बालबुद्धीचे समाधान होईल. तथापि बाह्यवस्तुद्वारा परमेश्वराबद्दल जे कांहीं ज्ञान आपणांस होते, ते इतकेंच की तो एक चतुर कारागीर असला पाहिजे; पण या ज्ञानाने विश्वाचे कोडे सुटलें असें ह्मणतां येत नाहीं. परमेश्वराने जर हे जग अनेक वस्तूंतून निर्माण केलें असें ह्मटले, तर त्या वस्तूंस परमेश्वरापूर्वीच अस्तित्व होते असें ह्मणणे भाग आहे. जग उत्पन्न करण्यास परमेश्वरास सुद्धा कांहीं वस्तूंची अपेक्षा लागावी हे त्याच्या सामर्थ्यास मोठे उणीव आणणारे आहे. सर्वसत्ताधारी आणि विश्व-उत्पन्नकर्ता असे ज्यास ह्मणावयाचे त्याची शक्ति याप्रमाणे कांहीं वस्तूंनी नियमित होते असे ह्मणणे ह्मणजे परमेश्वरावर भलत्याच दूषणाचा आरोप करण्यासारखे आहे. एकेश्वरी मतांतील भयंकर दोष हाच आहे. आपणांस एखादें घर बांधावयाचे असले तर ते बांधण्यास लागण्यापूर्वी त्यास लागणाच्या सर्व वस्तूंची जुळवाजुळव आपण प्रथम करतो. प्रथम वस्तु आणि नंतर कारागीर ही परंपरा आपल्या सामान्य अनुभवांतील आहे. परमेश्वराने विश्व रचिलें, या कल्पनेचा सरळ अर्थ असा होईल की, त्यावेळी सिद्ध असलेल्या वस्तूंतून जितकें कांहीं करता येण्यासारखे होते तितकें त्याने केलें; ह्मणजे त्याचे सामर्थ्य वस्तूने बद्ध झाले असे होत नाहीं काय? एकसत्ताधारी परमेश्वराची कल्पना ह्मणजे वस्तूंच्या शक्तीनें ज्याची शक्ति बद्ध आहे-जो स्वतः स्वतंत्र नाहीं-असा विश्वाचा कारागीर. वेदकालीन ऋषींनीही इतकाच शोध