पान:विवेकानंद.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड.]

श्रुतींतील तत्त्वज्ञानाची उत्क्रांति.

२९

दिसू लागतो; नंतर तास अर्ध्यातासाच्या आंतच त्या ढगाचा विस्तार वाढत वाढत इतका मोठा होतो की तो सर्व आकाश व्यापून टाकतो; नंतर ढगांवर ढग येऊ लागतात; जणु काय ढगांच्या एका थरावर दुस-या ढगांची पुटेंच बसत आहेत ! नंतर मुसळधार पावसास सुरवात होऊन सर्वत्र पाणीच पाणी होऊन जाते; उदासीनता नाहीशी होऊन झाडे आणि वेली आनंदाने पुन्हा डोलू लागतात; आणि सर्व सृष्टीला नवजीवन प्राप्त झाल्यासारखे दिसू लागते. हीच स्थिति प्रत्येक कल्पाचे वेळी घडते असे वेदांनीं वर्णन केले आहे. * आरंभी उदासीनता मात्र होती असे एक वेदवचन आहे; या एकाच वाक्यांत कल्पारंभींची स्थिति सूचित केली आहे. या एकाच वाक्यांत अनंत अर्थ भरून सांडत आहे. फक्त तीन चार शब्दांत इतका अर्थ भरला असल्याचे उदाहरण तुम्हांस दुसरें एकही सांपडावयाचें नाहीं. तीन कवींनी याच प्रकारच्या स्थितीचे वर्णन केल्याचे मला आठवते. * उजेड नव्हे, पण अंधार मात्र व्यक्त झाला होता' असें मिल्टन कवीने ह्मटलें आहे. “अंधाराच्या अंगांत सुई बोंचतां आली असती" असे वर्णन महाकवि कालिदासाने केले आहे. पण यांतील एकाही वर्णनांत वेदवचनांतील स्वारस्य आणि काव्य नाहीं.
 'ऊर्मी' हे सृष्टीचे मूलकारण आहे, असे वेदांत सांगितले आहे. आरंभ जें कांहीं होते त्याचे रूपांतर ऊर्मीत झालें; आणि या ऊर्मीचे रूपांतर होऊन ती इच्छा या रूपाने व्यक्त झाली. सर्व उत्पत्ति इच्छेपासून झाली असून जें कांहीं दिसते अथवा भासते त्याचे अस्तित्व इच्छेमुळेच आहे हे विशेषेकरून लक्ष्यांत ठेवण्यासारखे आहे. ऊर्मी हा वेदान्त आणि बौद्धमताचा मुख्य आधारस्तंभ असून पुढील सर्व इमारत याच्याच आधारावर उभी राहिली आहे. पुढे हे मत जर्मनीत गेले व त्याच्याच आधारावर सुप्रसिद्ध जर्मन पंडित शोपेनहॉर यानें आपलें दर्शन रचिलें आहे.
"मनाचे आद्य स्वरूप जी इच्छा ती आतां प्रथम उत्पन्न झाली. आपल्या प्रज्ञाबलानें आपलें अंतःकरण शोधणा-या ऋषींस, व्यक्त आणि अव्यक्त यांस जोडणारा दुवा सांपडला ! " या वचनांत या तत्त्वाची ओळख आपणांस प्रथमच होते. हाही एक विशेष ध्यानांत ठेवण्याजोगा मंत्र आहे. 'कदाचित् त्याला स्वतःलाच याचे ज्ञान झाले नव्हते' अशा अर्थाचे पद मंत्राच्या