पान:विवेकानंद.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड.]

श्रुतींतील तत्त्वज्ञानाची उत्क्रांति.

२७

संस्कृत स्थितीत नव्हता! एखाद्या क्षुल्लक मतभेदासाठी प्रत्यक्ष भावाच्याही नरडीचा घोंट घ्यावा ही कला मनुष्यप्राणी त्यावेळीं शिकला नव्हता ! क्षुल्लक वस्तूच्या लोभाने आपल्या हजारों बांधवांचा वध करून रक्ताच्या नद्या वाहविण्याचा धडा तेव्हां त्यास मिळाला नव्हता ! सुधारणेच्या नावाखाली स्वतःच्या बांधवांची कत्तल करण्याचे ज्ञान त्यास त्यावेळी नव्हते. यामुळे वेदांतर्गत वचनांची किंमत पूर्वीपेक्षां सध्याच शतपट अधिक वाटू लागली आहे. एकं सत् विप्रा बहुधा वदति।' हे शब्द प्रथम लिहिले गेले त्या काळापेक्षां सध्याच त्यांचा घोष आधिक उच्च-रवाने करण्याची आवश्यकता उत्पन्न झाली आहे. हिंदु, बौद्ध, मुसलमानी, ख्रिस्ती इत्यादि अनेक धर्म आस्तित्वात असले तरी त्या सर्वांचा परमात्मा एकच आहे हे नित्य लक्ष्यांत बाळगले पाहिजे. परका मनुष्य परधर्माचा ह्मणून जो कोणी दुस-याचा उपहास करतो, तो प्रत्यक्ष आपल्या परमेश्वराचाच उपहास करतो असे झटले पाहिजे.
  वेदकालीं एकेश्वरी मताचा उदय होऊ पाहत होता हैं अगोदर सांगितलेंच आहे. तसेच या मताने प्रगल्भ बुद्धीचे समाधान होऊ शकत नाहीं, हँहि अगोदर सांगितलेच आहे. या सर्व दृश्य जगाचे कोडें एकेश्वरी मताने सुटत नाहीं, किंबहुना तसे होणे अशक्य आहे, ही गोष्ट आर्यतत्त्वज्ञांच्या लक्षांत लवकरच आली आणि त्यांनी त्या मताचा त्याग केला. परमेश्वर एकच असून तो विश्वाचा शास्ता आहे असे मानील्याने विश्वांतील अनेक कोडीं शेवटपर्यंत कोडींच राहतात. परमेश्वराच्या या कल्पनेने ती सुटत नाहींत; मग त्यांतून तो परमेश्वर विश्वबाह्य आहे असे मानल्यावर तर या पूर्वीच्या कोड्यांत आणखी कांहींची भरच पडते. तो परमेश्वर अत्यंत शक्तिमान् आणि मनास उन्नति देणारा आहे असेंहि घटकाभर गृहीत धरले तरी हे कांहीं आमच्या कोड्याचे उत्तर नव्हे. आमच्यापुढे सध्या अत्यंत महत्त्वाचा असा जो प्रश्न आहे, आणि ज्याचे महत्त्व दिवसेंदिवस वाढतच जात आहे, त्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर या कल्पनेने मिळत नाही. विश्व कसे उत्पन्न झालें ? ते कोठून उत्पन्न झाले ? त्याचे अस्तित्व कशाच्या आधारावर आहे ? असे आमचे प्रश्न आहेत. या प्रश्नांच्या उत्तराकरितां आर्यतत्त्ववेत्त्यांनी विलक्षण खटाटोप केल्याचे वेदमंत्रांवरून दिसून येते. या प्रश्नांची उत्तरे त्यांनी अनेक ठिकाणी अनेक प्रकारची दिली आहेत. या सर्व मंत्रांत पुढील अर्थाचा जो