पान:विवेकानंद.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२६

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय

तथापि त्या कल्पनांची योग्य जोपासना व्हावयास इतक्याच गोष्टी पुरेशा नाहींत. त्याकरितां विचार आणि बुद्धि यांचीहि जोड अवश्य पाहिजे. बौद्ध धर्माच्या कल्पनांत ' सर्वो भूतीं सदयता' ही कल्पना फार श्रेष्ठ आहे. भूतदयेची कल्पना गांवळ्यांच्या हाती गेली की तिची माती होते ही गोष्ट आपण नेहमी लक्ष्यांत ठेवा. विद्वत्ता आणि बुद्धिमत्ता यांच्या साहाय्यानेच अशा कल्पनांचे योग्य चीज होते. अशा प्रकारचा हा बौद्ध धर्म हिंदुस्थानांत जन्म पावला आणि नंतर तो बाहेर देशी पसरविण्यास त्या धर्माचे उपदेशक कारण झाले. परक्या देशांत आपल्या धर्माच्या प्रसाराकरितां जाणारे असे बौद्ध हेच पहिले उपदेशक होत. त्यावेळी पृथ्वीवर जे कांहीं नामांकित देश होते त्यांत बौद्धधर्माचा प्रसार या बौद्ध भिक्षुनी अथवा उपदेशकांनी केला; पण हें प्रसाराचे कार्य चालू असतां धर्मप्रसारासाठी ह्मणून रक्ताचा एकही बिंदु जमिनीवर पडला नाही, हे लक्ष्यांत ठेवण्यासारखे आहे. चीन देशांत बौद्ध भिक्षुचा किती छळ झाला हे आपणास इतिहासावरून कळते. एकामागून एक अशा दोनतीन चिनी बादशहांनी हजारों बौद्ध भिक्षुचा वध केला. यानंतर मात्र सारें पारडे फिरले आणि बौद्ध  धर्मास अनुकूल दिवस आले. भिक्षुचा छळ करणारांचे पारिपत्य करावयास खुद्द बादशहा तयार झाला; पण खुद्द बौद्ध भिक्षुनींच त्यास तसे करू दिले नाही. याप्रमाणे हिंदुस्थानांतील सर्व धर्माची परमतसहिष्णुता आहे; आणि त्यांच्या अंगीं ती उत्पन्न होण्याचे कारण एकं सत् विप्रा बहुधा वदंति।' हा चरणच होय. हाच चरण आपणही विशेषे करून लक्ष्यांत ठेवावा अशी मी सूचना केली, त्याचेही कारण हेच आहे. आमच्या आर्य ऋषींनी इंद्र, मित्र, वरुण इत्यादि अनेक नांवांनी ज्याला संबोधिलें तें एकच आहे. नांवें अनेक असली तरी अभिप्रेत वस्तु एकच आहे.
वेद हे कधी लिहिले गेले याचा निर्णय अद्यापि झालेला नाही. हा काल ८००० वर्षांपूर्वीचा असावा असा अजमास आहे. हा काळ अलीकडे ओढण्याचा कितीहि यत्न अर्वाचीन पंडितांनी केला तरी तो आठनऊ हजार वर्षांच्या अलीकडे आणतां येत नाही. वेदग्रंथांतून उपलब्ध झालेली तत्त्वकुसुमें प्राचीन युगांतली असली तरी त्यांचा ताजेपणा मात्र अद्यापि पहिल्यासारखाच कायम आहे; इतकेच नव्हे तर पूर्वीपेक्षांहि ती आज अधिक प्रफुल्लित दिसत आहेत असे ह्मणावयास हरकत नाही. कारण त्याकाळी मनुष्यप्राणी सध्या इतका