पान:विवेकानंद.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड ]

श्रुतींतील तत्त्वज्ञानाची उत्क्रांति.

२५

पूर्ण मुभा असे. परमेश्वरविषयक कल्पना ह्मणजे निवळ बुद्धिभ्रम आहे-थोतांड आहे-अशा प्रकारचा उपदेश करीत चार्वाकपंथी लोक देशभर फिरत असत. ब्राह्मणांनी आपल्या पोटाची खळगी भरण्याकरितां हीं खुळे उपस्थित केली आहेत, असे सांगत त्यांनी साच्या देशभर खुशाल फिरावें. अशा पंथाच्या लोकांसही हिंदुस्थानांत कोणाकडून उपसर्ग लागला नाही. त्याचप्रमाणे खुद्द गौतम बुद्धाचीही गोष्ट आहे. तो जेथे जेथे जाई तेथे तेथे त्याने ब्राह्मणी धर्माचा उच्छेद करण्याचा यत्न केला एवढेच नव्हे तर ब्राह्मणांस पूज्य अशा वस्तूंचाहि नाश करण्यास त्याने कमी केले नाही. असे असतांही बुद्ध अगदीं वृद्धावस्थेपर्यंत खुशाल होता हे आपणांस माहीत आहेच. त्याचप्रमाणे जैन उपदेशक ब्राह्मणी देवतांचा आणि त्यांच्या परमेश्वरविषयक कल्पनांचा उपहास करीत सा-या देशभर खुशाल फिरत. परमेश्वराचे अस्तित्व मानणारे लोक खुळसट आहेत असे त्यांनी ह्मणावें. अशा रीतीची शेंकडों उदाहरणे दाखवितां येतील. मुसलमानी धर्माची वावटळ हिंदुस्थानांत येऊन पोहोचण्यापूर्वी धर्मच्छल या शब्दाचा अर्थही हिंदु लोकांस ठाऊक नव्हता. धर्मच्छलाच्या गोष्टींचें ज्ञान त्यांस परकीयांपासून झालें. फार लांब कशाला, पण सध्याही ख्रिस्ती देवळे बांधण्यांत आणि ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्यांत हिंदु लोकांची किती तरी मदत होत आहे ! धर्माच्या नांवाने हिंदुस्थानांत कधींहि रक्तपात झाला नाहीं. केवळ हिंदुधर्मासच ही गोष्ट लागू आहे असे नाही. तर आर्यावर्तीत जन्म पावलेल्या प्रत्येक धर्माला आणि पंथाला ही गोष्ट लागू आहे. परमतसहिष्णुता ही आर्यावर्तातील लोकांच्या रोमरोमांत खिळून गेली आहे. मग त्यांचा धर्म अगर पंथ कोणताही असो. बौद्धधर्माचेच उदाहरण आपण घेऊ. कांहीं बाबताँत बौद्धधर्म हा एक श्रेष्ठ धर्म आहे यात शंका नाहीं; पण बेदान्त आणि बौधद्धर्म हे एकच आहेत हे ह्मणणे अगदी निरर्थक आहे. ख्रिस्ती धर्म आणि मुक्तिफौज यांत जें साम्य आहे, तेच वेदान्त आणि बौद्ध धर्म यांत आहे असे ह्मणावयास हरकत नाहीं. बौद्ध धर्मात कांहीं अत्युत्कृष्ट अशा गोष्टी आहेत; पण त्या ज्यांच्या हाती पडल्या त्यांस त्यांचे रक्षण चांगल्या प्रकारे करतां आलें नाहीं. महात्म्यांपासून निघालेली तत्त्वरत्ने गांवक्ष्यांच्या हाती पडल्यासारखे झाले. मूळ कल्पना उत्कृष्ट-अगदीं अनुपमेय-होत्या; आणि त्या ज्यांच्या हाती पडल्या, त्या लोकांजवळ उत्साहही पुष्कळ होता यांत शंका नाहीं.