पान:विवेकानंद.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२४

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय

दान करण्यात आले आहे, त्या स्थलाच्या जवळच त्याचे कारणही देण्यांत आले आहे. ज्याप्रमाणे ग्रीक आणि बॅबिलोनियन देवतांपैकी शेवटी एक-एकच शिल्लक उरली व तिला सर्वेश्वरत्व देण्यांत आले, त्याचप्रमाणे बौद्ध आणि जैन यांनीही आपल्या महात्म्यांपैकी एकाला सर्वेश्वरत्वाचे दान केले आहे. बौद्धांचा गौतमबुद्ध आणि जैनांचा जिनेंद्र हे सर्वेश्वरत्वाच्या जागी असून बाकी देवदेवता त्यांच्या हस्तकांच्या जागीं योजिल्या आहेत. याप्रमाणे सर्व जग एकेश्वरी मताकडे धाव घेत असतां आर्यतत्त्वज्ञ मात्र येथेच न थांबता पुढे सरसावले. साच्या जगाच्या रीतीस अपवाद ह्मटला ह्मणजे आर्यतत्त्वज्ञांचाच होय. पण असे का झाले याचे कारणही त्यांनी दिले आहे. ते कारण इतकें पटण्याजोगें आहे की आर्यावर्तातील अनेक धार्मिक विचारांची वाढ त्यामुळे झाली, एवढेच नव्हे तर पुढे जगांतील सर्व धर्मातही त्यामुळे क्रांति घडून येईल यात शंका नाहीं. एकं सत् विप्रा बहुधा वदंति।' हेच ते कारण. ‘जें कांहीं आहे ते एकच आहे, ज्ञाते त्याला अनेक नांवे देतात.' असा त्याचा अर्थ आहे. एखाद्या विशिष्ट देवतेची स्तुति करतांना एखादा ऋषि अथवा मंत्रपाठक त्या देवतेला सर्वेश्वरत्वाचीं विशेषणे लावतो, तेव्हां तोही वस्तुतः त्या एकाचीच स्तुति करीत असतो असे समजावे. त्या एकाला तो स्वतःच्या इच्छेप्रमाणे निराळे नांव देतो इतकेच. ‘जें कांहीं आहे ते एकच आहे, ज्ञाते त्याला निराळीं नांवे देतात. हेच तत्त्व या सर्व मंत्रांच्या मुळाशी आहे. एकाच वस्तूला अनेक नांवें दिल्याने त्या वस्तूच्या गुणधर्मात फरक पडत नाही हे उघडच आहे. एकं सत् विप्रा बहुधा वदति।' या एकाच चरणाने एकंदर धर्मविचारांत प्रचंड क्रांति घडवून आणिली आहे. हिंदुस्थानांत धर्मच्छल असा कधी झालाच नाहीं; आणि कोणाही मनुष्याला केवळ त्याच्या धर्ममतांमुळे कोणाकडूनही उपसर्ग पोहोचला नाहीं, या गोष्टीचे तुह्मांस मोठे नवल वाटत असेल. केवळ धर्माकरितां ह्मणून दुस-या देशांत भयंकर रक्तपात झाले असतां हिंदुस्थान देश मात्र या पातकापासून अगदी अलिप्त कसा राहिला याचे तुह्मांस आश्चर्य वाटत असेल. ईश्वरवादी, निरीश्वरवादी, अद्वैती, द्वैती, एकेश्वरी इत्यादि अनेक पंथ या देशांत सुखासमाधानाने एकत्र राहिले आहेत. केवळ देहवादी अशा चार्वाकपंथाच्या लोकांसहि खुद्द ब्राह्मणांच्या मंदिरांत मज्जाव नसे; एवढेच नव्हे, तर ब्राह्मणांच्या दैवतांविरुद्ध आणि परमेश्वराविरुद्धही संभाषणे करण्यास त्यांस