पान:विवेकानंद.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३२

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय

त्यांची खात्री झाल्याचे दिसते. वेदांसंबंधाने युरोपियन लोकांनी लिहिलेले लेख व टीका हीं वाचावयास घेतली असता त्यांत या एकेश्वरी मताचा उल्लेख जागोजाग केलेला पाहून आह्मा हिंदूस लेखकाच्या बालबुद्धीबद्दल खरोखर हंसू आल्यावांचून राहत नाही. परमेश्वराबद्दलची श्रेष्ठतम कल्पना ह्मणजे व्यक्तिविशिष्ट परमेश्वर ( Personal God ) हीच होय असे ज्यांस लहानपणापासून बाळकडू मिळालेले आहे, त्यांच्या बुद्धीस पुढे सरसावण्याचा धीर झाला नाहीं यांत नवल नाहीं. पाप आणि भीति या कल्पना क्षुद्र आणि तत्त्ववेत्त्यांस व अत्यंत प्रगल्भ विचारांच्या मनुष्यास शोभणाच्या नाहीत अशी. आमच्या आर्यतत्त्ववेत्त्यांची लवकरच खात्री होऊन त्यांनी या कल्पनांचा एकदम त्याग केला आणि याहून उच्च दर्जाच्या सिद्धांतांकडे ते वळले. हे सिद्धांत सिद्ध करण्याच्या कामी त्यांनी आपल्या बुद्धीस आटोकाट ताण दिल्याचे दृष्टोत्पत्तीस येते. सर्व विश्वाचे निवासस्थान’ आणि ‘सवांतर्यामी' अशा प्रकारची विशेषणे त्यांनी आपल्या ईश्वरास लाविली होती, तथापि एकेश्वराच्या अस्तित्वाची कल्पना त्यांच्या बुद्धीस रुचली नाही ही गोष्ट मात्र खरी. अगदी सामान्य मानवीवुद्धीस मात्र ही कल्पना योग्य असून तत्त्ववेत्त्याला ती शोभणारी नाहीं असे त्यांस वाटले. हिंदुतत्त्ववेत्ते निःसीम धैर्यवान् किंबहुना धीट होते हें कबूल केल्यावांचून गत्यंतर नाहीं. अमुक एका कल्पनेपलीकडे भरारी मारावयाची नाही अशा प्रकारची मर्यादा त्यांनी स्वतःस कधीच लागू करून घेतली नाही. हे त्यांचे असामान्य धैर्य खरोखर तारीफ करण्यासारखे आहे यांत संशय नाही. त्यांच्या बुद्धीची प्रतिभा इतकी प्रखर हौती की तिच्या एखाद्या किरणाच्या दर्शनाने मी मी ह्मणविणारे पाश्चात्त्य पंडित दिपून जातात. भट्ट मोक्षमुल्लर यांनी एका जागीं असें ह्मटले आहे की ‘अत्युच्च गिरिशिख-- रांचा प्रवास निर्धास्त अंतःकरणाने करण्यास एकटे आर्यतत्त्ववेत्ते मात्र समर्थ आहेत. उत्तुंग शिखरावर श्वासोच्छ्रास करण्याची शक्ति फक्त त्यांच्याच फुफ्फुसांत आहे. इतरेजन तेथे गेले तर त्यांची छाती खचित फाटून जाईल.' मोक्षमुल्लर भट्टांचे हे उद्गार अगदी यथार्थ आहेत. स्वतःच्या विवेचकबुद्धीला त्यांनी कधीहि लगाम घातला नाही. त्यांनी तिला अगदी स्वतंत्रपणे संचार करू दिला आणि स्वतः ते तिच्या मागे गेले. एखादी सामान्य कल्पनाही आपणा मनुष्यांस किती प्रिय असते आणि तिला आपण कसे चिकटून बसत