पान:विवेकानंद.pdf/305

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
खासगी पत्रे.

२९५


- मासिकासाठी तयार केलेले ब्रीदवाक्याचे चित्र मला आवडलें नाहीं. तें बेढव तर आहेच; पण त्याशिवाय त्यांत कित्येक गोष्टी निरर्थक घुसडून दिल्या आहेत. अशा प्रकारचें चित्र शक्य तितकें साधें, लहान आणि विशेष हेतूचें दर्शक असे असावें. चित्र पाहिल्याबरोबर त्यांतील भाव लक्ष्यांत आला पाहिजे. बाकीचें काम ठीक चालले आहे हे मी मोठ्या आनंदानें कवूल करतों.
 मला एका गोष्टीबद्दल मात्र कांहीं कानमंत्र सांगावासा वाटतो. हिंदुस्था- 'नांतील दहापांच मनुष्ये एकत्र होऊन कांहीं उद्योग करूं लागली म्हणजे जी एक चूक बहुधा नेहमीं करतात, ती चूक त्यांना शेवटीं गोत्यांत घालून कार्या- चाही फडशा पाडते. आमच्यांत अद्यापि खऱ्या व्यापारी तत्त्वांचा प्रवेशच झालेला नाहीं. धंदा म्हटला की तो धंदाच. तोच त्यावेळी परमेश्वर. त्यांत स्नेहसंबंध आड येतां उपयोगी नाहीं. हें लक्षण आम्हा हिंदूत अद्यापि आढ- कळत नाहीं. 'हा माझा अमका; याची भीड कशी मोडावी?" ' हे कोण बाय- कोचे साले । तुपावेगळा घांस न गिळे ।' अशा प्रकारच्या भिडेचें दडपण एखाद्या उद्योगावर पडले की त्याखाली त्याचा सारा चुराडा होण्याला वेळ किती ? असली भिकारी लाज प्रथम सोडून या. हिशेब नेहमीं चोख राखीत जा. आपल्या ताब्यांत जें कांहीं द्रव्य असेल त्याचा हिशेब पैपर्यंत बरोबर ठेविला पाहिजे. ज्या कार्यासाठीं जें द्रव्य जमा झाले, त्याचा उपयोग त्याच कार्याला झाला पाहिजे. उपाशीं मरण्याची वेळ आली तरी प्राणरक्षणार्थसुद्धां त्यांतल्या दमडीलाही बोट लावूं नये. त्या एका कार्याखेरीज दुसन्या कशाकडेही त्यांतील एक कवडीसुद्धां वेंचतां उपयोगी नाहीं. याला म्हणतात धंद्यांतला चोखपणा. हा आमच्या अंगीं केव्हां येणार ? भीड तोडावयाला आम्ही केव्हां शिकणार ? दुसरी महत्वाची गोष्ट म्हटली म्हणजे चिकाटी. जी गोष्ट हातीं धरली, तिला एकसारखें चिकटून राहावयाचें. ध्यानीं, मनीं, स्वप्नीं ती एकच. गोष्ट. त्याच गोष्टीची अव्यभिचारी भक्ति करावयाची. ती गोष्ट सोडून मन दुसरीकडे भरकटलें कीं व्यभिचाराचें पातक घडलेंच. हे मासिक हाच आतां तुमचा परमेश्वर. अशी भक्ति असली तर यश तुमचेंच आहे हें काय निराळें सांगावयास पाहिजे ?
 हें मासिक यशस्वी झाले म्हणजे असाच प्रयत्न देशी भाषांतूनही सुरू केला पाहिजे. तामीळ, तेलगु, कानडी इत्यादी भाषांत नवीं मासिकें अगर पत्रे सुरू