पान:विवेकानंद.pdf/306

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२९६
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय

केलीं पाहिजेत. मद्रासी लोक हुषार आहेत आणि त्यांच्यांत कर्तवगारीही आहे. पण ज्या भूमींत आद्य श्रीशंकराचार्यांचा जन्म झाला, त्या भूमीतून संन्यस्त वृत्ति मात्र सध्या पळून गेल्याचें दिसतें.
 आपल्यांतील ही वृत्ति मावळली असल्यामुळेच जागोजाग खाडे पडले आहेत. माझ्या मुलांनीं. हे खाडे भरून काढले पाहिजेत. त्यांनी संसारावर पाणी सोडिलें पाहिजे. इतकें झालें तरच पुढील इमारतीचा पाया तयार होईल.
 आतां कार्याला लागा. चित्रांसारख्या किरकोळ बाबींकडे लक्ष्य देण्यास आपणांस फुरसत कोठे आहे ? घोडा आपल्या हस्तगत झाला म्हणजे त्याची लगामही हातीं येईल. एखाद्या क्षुल्लक गोष्टीसाठी मोठे कृत्य लांबणीवर टाकू नये. मी सदोदित तुमच्या सन्निध आहेच. यासाठी कसलीही भीति मनांत न बाळगितां उद्योग करीत जा. मी मेलों तरी माझा जीवात्मा तुमच्या सन्निध राहीलच. बाळांनों, देह आज आहे आणि उद्यां नाहीं. संपत्ति, कीर्ति इतर भोग्यवस्तु यांत तरी चिरकाल टिकणारे काय आहे ? आपले सर्व व्यव हार मृत्यूच्या मुखांतच चालू आहेत. मग संसारकूपांत राहून किड्यासारखे मरण्यापेक्षां सत्यासाठी लढत असतां धारातीर्थी वीराला उचित असें मरण तरी मिळवूं या. व्हा तर पुढें !

विवेकानंद.