पान:विवेकानंद.pdf/304

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२९४
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


भगवान् रामकृष्णांच्या लीलांचे ठिकाण हेंच. ती त्यांच्या अवतारकृत्यांची जागा. मद्रासच्या मठाकरितां लागणारें द्रव्यसाहाय्य बहुधा हिंदुस्थानांतच मिळेल अशी आशा आहे.
 वर लिहिलेल्या तीन ठिकाणांतून आपण आपल्या कार्याला सुरुवात करूं. मग हळुहळु मुंबई आणि अलाहाबाद इकडे प्रवेश करूं. इतकें काम येथे झाल्यावर हिंदुस्थानांतच काय, पण देशोदेशी आपण आपले प्रचारक पाठवू शकूं. पण त्याबद्दल अधिक चर्चा आज कशाला? परमेश्वराची मर्जी असेल तसे होईल. आतां झटून कामाला लाग.
 इंग्रजी भाषेत एक मासिक सुरू करण्याचा आपला बेत आतां मुकर झाला. आतां कांही मासिकें देशी भाषांतूनही सुरू केली पाहिजेत. अशा प्रकारच्या पत्रांना आश्रय देणारा वाचकवर्ग फारसा मोठा नसावयाचा हे उघडच आहे. आपल्या इंग्रजी मासिकाला हिंदु लोकांनीच प्रथम संभाळिलें पाहिजे. जगांतील - सर्व देशांत एखाद्या पत्राचा प्रसार व्हावयाचा तर त्यांत सर्व देशांतील लेखक पाहिजेत; म्हणजे त्याचा अर्थ इतकाच की वर्षांकांठी एक लाख रुपये खर्च करण्याची तयारी पाहिजे.
 एक गोष्ट लक्ष्यांत नित्य बाळगीत जा. ती ही कीं माझें कार्यक्षेत्र एकरें हिंदुस्थानच नसून सारें जग आहे.

तुमचा,


विवेकानंद.


पत्र ३७ वें.


स्विट्झर्लंड,


ता० २६ ऑग० ९६.


प्रिय--
 आपले पत्र आतांच मिळाले. मी सध्या फिरतीवर आहे. सध्या मी डोंग- राळ प्रदेशांत फिरत आहे. आल्प्स पर्वतांत भी बराच प्रवास केला, आणि जर्मनीला जाण्याच्या तयारीत आहे. ड्यूसन यांनीं कील येथें मला भेटीला बोलाविलें आहे. तेथून मी इंग्लंडला जाईन. येत्या हिवाळ्यांत बहुधा मी तिकडे येईन..