पान:विवेकानंद.pdf/303

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
खासगी पत्रे.

२९३

पत्रे ३५ वें.


वेस्टमिस्टर, ११ नोवें. ९६.


प्रिय -
 येथून १६ डिसेंबरच्या सुमारास निघेन. येथून प्रथम मी इटलीस जाईन.. तेथें कांहीं दिवस राहून नंतर नेपल्स येथें आगबोटीवर चढेन.
 राजयोगाची पहिली आवृत्ति संपून दुसरी छापण्याची तयारी चालू आहे.- पहिल्या प्रतीचा खप बहुतेक अमेरिकेंत आणि हिंदुस्थानांत झाला.

तुमचा,


विवेकानंद.


पत्र ३६ वें.


लंडन, २० नो. ९६.


प्रिय-
 डिसेंबर १६ तारखेला येथून निघून इटलीला जाण्याचा माझा बेत निश्चित झाला आहे. तेथून मी नेपल्स येथें जाईन, आणि जर्मन बोट प्रिंझ रीजंट लि. ओपोल्ड या बोटीनें तिकडे यावयास निघेन. सिलोन येथें ही बोट ता. १४ जानेवारीला पोहोंचावयाची आहे. सिलोनांत कांहीं दिवस हिंडून मग मी मद्रा- सेस जाईन.
 मि. सेव्हियर हे आल्मोराच्या जवळपास एखादी जागा घेणार आहेत. त्या ठिकाणी आपला हिमालयांतील मठ बांधण्याचा माझा विचार आहे. आमचे पाश्चात्य ब्रह्मचारी आणि संन्यासी बहुधा येथें राहतील. गुडविननें लग्न केलेलें नाहीं. तो जवळ जवळ संन्यासीचं झाला आहे. मजबरोबर फिरत राहण्याचा त्याचा बेत आहे.
 भगवान् रामकृष्णांच्या जन्मदिवसाच्या आधीं कलकत्त्याला पोहोचण्याची माझी उत्कट इच्छा आहे.
 आपल्या कार्याला सुरुवात म्हणून दोन मठ प्रथम सुरू करण्याचा माझा बेत आहे. एक कलकत्ता येथें आणि दुसरा मद्रास येथे. त्यांतून तरुण उपदे- शक तयार करावयाचा बेत आहे. कलकत्त्याच्या मठाला पुरण्यापुरती द्रव्य- सामुग्री माझ्याजवळ आहे. पहिला मठ कलकत्त्यालाच निघाला पाहिजे; कारण