पान:विवेकानंद.pdf/301

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
खासगी पत्रे

२९१


तो लेख एकंदरीने बराच चांगला झाला आहे असे म्हटले पाहिजे. श्रीरामकृष्णांचे चरित्र ते लिहिणार असल्याचे त्यांनी मला नुकतेच कळविले आहे. या कामी मी त्यांना थोडी बहुत मदत केली आहे; पण आणखी बरीच सामुग्री तुमच्याकडून आली पाहिजे.
 एकसारखे आपले कार्य सुरू ठेवा. वाटेल ते करण्याची आणि हाल सोसण्याची तयारी तुम्हीं केली पाहिजे. * मूखमाजी परम मूर्ख। जो संसारीं मानी सुख । संसारदुःखी एवढे दुःख । आणीक नाहीं ॥' हे विसरू नको.

तुम्हां सर्वांचा,


विवेकानंद.


पत्र ३३ वें.


दुईबेल्डन,


इंग्लंड, २२ सप. १८९६.


प्रिय--
 प्रोफेसर डयूसन यांच्या संगतींत माझा जर्मनीतील काळ फारच सुखाचा गेला. तेथून आम्ही दोघे बरोबरच लंडनला आलो. त्यांचा मजवर फार लोभ जडला आहे.
 अद्यापि कितीतरी काम पडले आहे. उदाहरणार्थ, तुळशीदास, कबीर, नानक आणि दक्षिणेतील कित्येक साधू , यांची चरित्रे अवश्य तयार झाली पाहिजेत. पण ती मुद्देसूद आणि रेखीव असली पाहिजेत, कशीतरी वेठ चारलेली नसावी.

तुमचा,


विवेकानंद.


लंडन,


ता. २८ अक्टोबर १८९६.


प्रिय--
 कोणत्या महिन्यांत मी हिंदुस्थानांत येऊन पोहोंचेन हे आज मला नक्की सांगता येत नाही. त्याबद्दल मी पुढील पत्रीं लिहीन, नव्या स्वामींनी एका