पान:विवेकानंद.pdf/300

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२९०
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय

पत्र ३२ वें.


प्रिय -


 आपणांस सध्या अनेक गोष्टींची आवश्यकता आहे. प्रथम सर्व प्रकारच्या व्यवहारांत चोखपणा- अत्यंत चोखपणा असला पाहिजे. तुमच्यापैकी कोणी लुच्चा आहे असा माझ्या म्हणण्याचा अर्थ करूं नको. तसे माझ्या स्वप्नांतही येणार नाहीं; पण आम्हां हिंदु लोकांना या वाबतींत कांहीं दुष्ट संवयी लागल्या आहेत. आमच्या एकंदर व्यवहारांत अव्यवस्थितपणा फार असतो. हिशेब रोजच्या रोज लिहून ताळेबंदांत पैचीही चूक राहूं न देणे आणि सर्व व्यवहार शिस्तीने करणे या गोष्टींची संवयच आमच्या अंगीं नाहीं.
 दुसरें असें कीं कोणतेंही काम हाती घेतलें तर त्याची अव्यभिचारी भक्ति बाणली पाहिजे. तें कार्य उत्तम रीतीने पार पाडीपर्यंत आपणांस मुक्ति मिळा- वयाची नाहीं, असें आपणांस वाटत राहिले पाहिजे. जें मासिक तुम्ही सुरू केलें आहे, त्याचीच योजना इष्ट देवतेच्या जागीं करा. मग यश कसे येतें हैं तुम्हांला दिसेल. अत्यंत पवित्रपणा आणि गुरूच्या ठिकाणी निःसीम आज्ञाधारकता हींच यशाची प्रमुख साधनें आहेत हें विसरूं नको.
 एखाद्या धार्मिक वर्तमानपत्राचा परदेशांत मोठा खप होईल अशी भलतीच आशा बाळगूं नका. हिंदूंच्या अंगीं कांहीं सद्गुण आणि कृतज्ञता असेल तर त्यांनींच अशा पत्रांना आश्रय दिला पाहिजे.
 तुम्हीं आपल्या मासिकांतून वेदान्ताचा प्रसार अवश्य कराच; पण धर्मा- च्या बाबतीत कांहीं नवी कल्पना कोणीं काढिली अथवा एखादा नवा शोध लागला, तर त्यांचाही समावेश तुमच्या मासिकांत झाला पाहिजे.
 मिसेस अॅनि बेझंट यांनी भक्तीवर व्याख्यान देण्यासाठी आपल्या थिऑ- सफीच्या मंदिरांत मला बोलावलें होतें. त्यांच्या बोलावण्याचा स्वीकार करून मी एक व्याख्यान दिले. कर्नल ऑल्कॉट हेही हजर होते. सर्व प्रकारच्या पंथांशी माझी सहानुभूति आहे, हे दाखविण्याकरितां मीं हें व्याख्यान देण्याचें कबूल केलें. आमच्या लोकांनी एक गोष्ट अवश्य लक्ष्यांत बाळगली पाहिजे, ती ही कीं, धार्मिक बाबतींत गुरुपद आम्हांलाच योग्य आहे, परकीयांना नाहीं. व्यावहारिक ज्ञान मात्र आम्ही त्यांजपासून शिकलें पाहिजे.
 मोक्षमुल्लर यांचा लेख मीं पाहिला. मि. मुझुमदार यांच्या छोट्याशा पुस्तकाशिवाय अधिक माहिती त्यांस मिळाली नाहीं ही गोष्ट लक्ष्यांत घेतां,