पान:विवेकानंद.pdf/299

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
खासगी पत्रे.

२८९


 आतां वर्तमानपत्रांतल्या ढोलकें पिटणारांचा मला पुरा पुरा कंटाळा आला आहे. जगांतले अनेक मूर्ख काय म्हणतात त्याला कान बहिरे करून, आपण आपल्या कामाला लागावें. सत्याच्या मार्गात कोणीही आड येऊं शकत नाहीं. स्विट्झर्लंडांतही मी कांहीं एकाच गांवीं बसून राहत नाहीं. या गांवाहून त्या गांवीं असा मी बहुधा एकसारखा फिरत असतो. एखादा लेख लिहि ण्याचें काम माझ्याने होणार नाहीं, आणि सध्यां तें मला करावयाचेंही नाहीं. सध्या फार वाचनही उपयोगाचें नाहीं. पुढल्या महिन्यांत लंडनांत गेलों ह्मणजे तेथलें काम, माझी वाट पाहात बसलेंच आहे. हिवाळ्यांत मी तिकडे येईन आणि तेथल्या कामाचा कसा काय जम बसतो ते पाहीन.
 तुह्मां सर्वोवरच माझें प्रेम आहे. शूर बच्चांनों, आतां कार्याला लागा. आतां नाहीं' हा शब्दसुद्धां आपण विसरला पाहिजे. आपल्या कार्याच्या मागें परमेश्वर उभा आहे. त्याची महाशक्ति तुमच्याबरोबर आहे. मग त्यांना आतां उगीच तिष्ठत कां ठेवतां ?

तुह्मां सर्वाचा,


विवेकानंद.


पत्र ३१९ वें.


खेत्री, २ एप्रिल.


प्रिय डॉक्टर,
 आपलें पत्र आतांच पावले. माझ्यासारख्या क्षुद्र मनुष्यावर तुझी इतकें प्रेम करता हैं पाहून मला धन्यता वाटते. बिचाऱ्याच्या मुलाला देवाज्ञा झाली हे ऐकून मला अत्यंत वाईट वाटलें. ज्याची ठेव त्यानें नेली. " नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः सिद्धांत आपणा सर्वोस अवगत आहेच. याकरितां प्रसंगाला मान वांकविणे इतकेच कायतें आपल्या हाती उरतें. पूर्ण शांतीनें प्रसंग सोसणें हेंच आपले काम आहे. तोफांच्या तोंडावर चालून जाण्याचा हुकूम सेनापतीनें दिला, तर तो अक्षरशः पाळणें हेंच शूर शिपा- याचें काम आहे. त्याबद्दल कुरकुर करून उपयोग काय ? ती सर्वोतर्यामी दयामय जननीच त्याचें सांत्वन करो. त्याला तिनें आपल्या पोटाशी घ्यावें हीच इच्छा बाळगणारा,

विवेकानंद.


 स्वा. वि. खं. ३ - १९


"