पान:विवेकानंद.pdf/298

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८८
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


शिकले पाहिजे. स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं, ही म्हण सर्वत्र सार- खीच लागू आहे. हीच खरी देशभक्ति. ज्या देशाला हें साधत नसेल, त्याची वेळ अद्यापि आली नाहीं असेंच समजले पाहिजे. त्याने आणखी कांहीं काळ वाट पहावी. आपणांस साऱ्या हिंदुस्थानांत प्रकाश उत्पन्न केलाच पाहिजे. या दृष्टीने आपण आपल्या कार्याला लागले पाहिजे.
 कमळ ही पुनरुत्थानाची खूण आहे. पूर्वीच्या उच्चस्थितीचा अरुणोदय पुन्हा होऊं लागला आहे असें ही खूण सुचविते. ललितकलांत आणि त्यांतही विशेषतः चित्रकलेत तर आपण फारच मागसलेले आहों. नव्या कल्पना चित्रित करण्याचें आपणांस मुळींच माहीत नाहीं. घनदाट अरण्यांत एखादें लहानसें तळें असून, त्यांत कमळे नुकतींच उमलूं लागली आहेत असा एखादा देखावा तयार केला, तर किती मनोहर होईल! अशाच प्रकारच्या दुसऱ्या शेंकडों कल्पना चित्ररूपानें मांडतां येण्यासारख्या आहेत; पण हे हळूहळू होईल.
 पुढच्या रविवारी मी स्विट्झर्लंडांत जाणार आहे. तेथून पावसाळ्याच्या सुमारास परत येईन, आणि पुन्हा कार्यास लागेन. सध्या मला विश्रांतीची गरज फारच आहे, हे आपणांस ठाऊक असेलच.
 परमेश्वराचा तुम्हा सर्वोस आशीर्वाद मिळण्याची इच्छा करणारा,

विवेकानंद.


पत्र ३० वें.


६ ऑगस्ट १८९६.


प्रिय --
 इतक्यांतच असा घाबरूं नको. धीर सोडूं नको. माझ्या मुला, आपल्या हातून फार मोठमोठी कार्ये व्हावयाची आहेत; मग आतांच जर आपण असे हताश झालों, तर कसें होईल ? धैर्य धरं.
 भट्टै मोक्षमुलर यांजकडून मला फारच सुंदर पत्रे येत असतात. भगवान् रामकृष्णांचे एखादे मोठें चरित्र लिहावें, या हेतूनें ते सामुग्री जमा क आहेत.