पान:विवेकानंद.pdf/297

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खासगी पत्रे.

२८७


ग्रंथांतील कांहीं सूचना अशा आहेत की, त्यांकडे अर्वाचीन इंद्रियविज्ञानवेत्त्यांचें लक्ष्य जितक्या लवकर जाईल तितकें बरें. असो. एकंदरीनें झालें तें ठीक असेंच म्हटले पाहिजे. माझ्याबद्दल कोणी चार वाईट शब्द बोलल्यास त्याचे मला कष्ट नाहींत. वरी अथवा वाईट- ट-पण या विषयाची सर्वत्र चर्चा व्हावी इतकीच माझी इच्छा आहे.
 आपल्या कार्याला नुकता कोठें आरंभ झाला आहे. इतक्यांतच एखाद्या लहानशा अडचणीला भिऊन आपण हातपाय गाळले तर कसें होईल ? आतां आपल्या उद्देशाला एकसारखें चिकटून बसले पाहिजे. ' झालें तें पुष्कळ " असें कधींच म्हणूं नये.
 या पाश्चात्यदेशांत एखादा मनुष्य आला आणि त्यानें नाना देश पाहिले म्हणजे त्याचे डोळे लख्ख उघडतात. अशा रीतीनें फिरतांफिरतांच माझे साहाय्यकारी मीं मिळविले आहेत. आमच्या हिंदुस्थानांत काय चिजा अपूर्व आहेत आणि कशाची तेथें उणीव आहे याची स्पष्ट ओळख इकडे करून दिल्यावरच मला सध्याचे साहाय्यकर्ते मिळाले आहेत. नुसत्या बडवडीनें इकडे कोणाची डाळ शिजेलसें वाटत नाहीं. खरोखर, दहाबारा लाख हिंदू जर जग- भर प्रवास करतील, तर त्यांत आपलें केवढे तरी हित होईल !

आपला,


विवेकानंद.


पत्र २९ वें.


ता. १४ जुलै १८९६.


प्रिय डॉक्टर-
 किती केलें तरी खुद्द इंग्रजाला इंग्रजी भाषा जशी लिहितां येईल तशी खुबी परकीयाला कधींही साधणार नाहीं. खुद्द इंग्रजांनी लिहिलेल्या पुस्तकांतील कल्पनांचा प्रसार जितका लवकर होईल, तितका हिंदु 'इंग्रजी' ग्रंथांतील कल्पनांचा होणार नाही. त्यांतल्या त्यांत इंग्रजी भाषेंत एखादा निबंध लिहिणें एक वेळ फारसें कठीण नाहीं; पण एखादी गोष्ट लिहिणें हें तर फारच कठीण !
 परकीयांकडून आपणांस मदत मिळेल, अशी भलतीच आशा बाळगूं नका. एखाद्या व्यक्तीनें काय अथवा राष्ट्रानें काय, आपल्याच पायांवर उभे राहण्यास