पान:विवेकानंद.pdf/296

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८६
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


ठेवण्याला तयार होतील आणि कमरा बांधून सत्यासाठी या जगाच्या अफाट रणांगणावर येतील, त्याच वेळीं मद्रासला जागृति येईल. देशोदेशीं फिरून सत्याच्या वतीनें लढाया केल्या पाहिजेत. आजची वेळ अशी आहे, कीं बाहेर देशी बजावलेली एक कामगिरी, देशांतल्या हजार कामगियांची बरोबरी करील. परमेश्वराची मर्जी असेल, तर तसें अझूनही घडून येईल.
 भट्ट मोक्षमुल्लर मजवर दिवसेंदिवस अधिक प्रेम करूं लागले आहेत. दोन व्याख्यानें देण्यासाठीं मी लवकरच ऑक्सफर्डला जाणार आहे.
 वेदान्तावर एक मोठा ग्रंथ लिहिण्याची तयारी मी सध्या करीत आहे. द्वैत, विशिष्टाद्वैत आणि अद्वैत यांजसंबंधींचीं श्रुतिवचनें गोळा करण्यांत मी गुंतलों आहें. संहिता, ब्राह्मणे, उपनिषद्ग्रंथ आणि पुराणे यांतून या तीन मतांना पोषक अशीं वचनें तुम्हीं कोणीं निवडून काढलीं, तर मला फार उप- योग होणार आहे. अशीं वचनें काढून त्यांचे वर्गीकरण करावे आणि त्या त्या सदरांत तीं नमूद करून, ग्रंथाचें नांव, अध्याय, वगैरे आंकडे पुढे लिहावे. ग्रंथरूपानें आपल्या तत्त्वज्ञानाची खूण मार्गे ठेवल्याशिवाय इकडून निघून येणें मला बरे वाटत नाहीं.
 उपनिषदें तामीळ लिपीत छापलेली असून, तीं म्हैसूर येथें प्रसिद्ध झालेली आहेत. या ग्रंथाची एक प्रत प्रोफेसर डयूसन यांच्या संग्रहीं मीं पाहिली. देवनागरी लिपीत छापलेला असा एखादा ग्रंथ मिळाल्यास अवश्य पाठवावा. न मिळेल तर ती तामीळ प्रत पाठवून • तीबरोबर एका कागदावरं तामीळ अक्षरें आणि त्यांसमोर नागरी लिपीतील तींच अक्षरें लिहून पाठवावीं, म्हणजे तामीळ अक्षरांची ओळख मी करून घेईन.
 मद्रासेंतील अँग्लो-इंडियन वर्तमानपत्रांत प्रमुख असलेल्या 'मद्रास मेल' पत्रांत, माझ्या राजयोगाच्या पुस्तकावर फार अनुकूल अभिप्राय आला अस ल्याचें मि० सत्यनाधन यांनी सांगितले. त्यांची व माझी भेट लंडनांत झाली. त्या ग्रंथांत जी कांहीं नवीं विधानें मीं केली आहेत, त्यांकडे कांहीं प्रमुख अमे- रिकन इंद्रियविज्ञानशास्त्र्यांचें लक्ष्य वेधल्याचें माझ्या कानावर आले आहे. उलटपक्षी विलायतेंतील कांहीं. शास्त्रज्ञांनी माझी थट्टाही • उडविली आहे. झाले तँ ठीकच झालें, माझीं कांहीं विधानें भयंकर धाष्टर्यांची आहेत आणि त्यांपैकी बरींचशीं विधानें कदाचित् अखेरपर्यंत अर्थशून्यच राहतील ! तथापि त्या