पान:विवेकानंद.pdf/295

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खासगी पत्रे.


पत्र २८ वें.

१४,ग्रेकोट गार्डन्स,


वेस्टमिन्स्टर, लंडन..

प्रिय -
 स्विट्झर्लंडांतून मी परत आल्याला आज तीन आठवडे झाले. लंडनांतील माझे कार्य हळूहळु वृद्धिंगत होत आहे. शिष्यवर्ग हळूहळू वाढत आहे. वेदान्त आणि योग यांची गोडी अमेरिकन लोकांना फारच लागत चालली आहे. सध्यां तेथें वीस संन्यासी जाऊन राहिले तरी त्या सर्वोचें काम नीट चालेल, एवढा मोठा शिष्यवर्ग आज तेथें तयार आहे. खरीं नाणीं जर भरपूर मिळालीं, तर अमेरिकन संस्थानें दहा वर्षांच्या अवधींत आपण पादाक्रांत करून टाकूं; पण तशीं माणसे आहेत कोठें ? तुमच्याइकडे पहावें, तर सारा वाजार मूर्खोनी भरलेला ! ब्रह्मज्ञानाच्या आणि स्वदेशभक्तीच्या बाता मात्र सवाहात माराल ! मद्राशांत मात्र कांहीं थोडें स्थैर्य आणि आपलें घोडें पुढें दमटण्याची विद्या आहे; पण पहावा तो प्रत्येक पुरुष चतुर्भुज ! प्रत्येकाच्या पायांत सवामणाची बेडी आहेच. अनासक्त राहून गृहस्थाश्रमी होणें हें वाईट आहे असें मी ह्मणत नाहीं; पण सध्या आपल्याला जर कशाची अत्यंत जरूर असेल, तर ती ब्रह्मचर्याचीच.
 बाळा, आतां मला कशीं माणसें हवींत तें सांगूं का ? लोखंडाचे स्नायू, पोलादी ज्ञानतंतू आणि वज्राचीं मनें असलेली माणसे मला हवींत. क्षत्रि- याचें वीर्य आणि ह्म-तेज ह्रीं जेथें एकवटली असतील असे नरसिंह मला पाहिजेत. माझ्या नजरेसमोर आज अशी लक्षावधि मुले खेळत आहेत.. माझ्या आशा पूर्ण करण्याचा अंकुर त्यांच्या ठिकाणीं मला दिसतो. अरेरे !. काय करूं ? आतां या सुंदर बच्चांचे बलिदान होईल. होमकुंडांत त्यांची पूर्णा- हुति पडेल. लग्न ! लग्न !! त्या तसल्या होमांच्या धडाडून पेटलेल्या अग्निज्वाला मला दिसत आहेत. हीं माझी सुंदर लेंकरें त्यांत लोटलीं जात आहेत. परमे- श्वरा ! या पिळवटलेल्या अंतःकरणांतून निघालेल्या आरोळ्या तुझ्या कानांवर अजून आदळत नाहींत काय ? किमानपक्ष शंभर मद्रासीतरी संसारावर अग्नि