पान:विवेकानंद.pdf/290

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८०
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


माघार घेतली नाहीं. त्यांतील तत्त्वज्ञान त्यांच्या कुशाग्र बुद्धीला सर्वथैव पटलें आणि त्यांचें पूर्ण समाधान झाले. ज्या धैर्यानें त्यांनी या कार्याला हात घातला होता, त्याच धैर्यानें त्यांनीं या तत्त्वज्ञानाची अलौकिकता लोकांच्याही नजरेला आणली. वेदान्ताबद्दल ज्या थोड्या पंडितांनी अत्यंत स्पष्ट असे उद्गार काढले, त्यांत डॉ० ड्यूसन यांची प्रमुखत्वानें गणना केली पाहिजे. आपण वेदान्त- मताबद्दल चार चांगले शब्द वोललों तर जुने नाणावलेले पंडित काय म्हण- तील, हा क्षुद्र विचार त्यांच्या चित्ताला शिवलाही नाहीं. सत्यालाही धैर्याच्या पाठिंव्याची गरज या जगांत लागत असते. तशांतून युरोपची स्थिति तर सध्या इतकी नाजुक झाली आहे कीं, प्रसिद्ध तत्त्वदर्शी आणि पंडित यांना लोकमतास भ्यावें लागतें. युरोपांत आज अशा अनेक प्रकारच्या रूढी आणि अनेक प्रकारचे पंथ अस्तित्वांत आहेत की, त्यांजबद्दल यांपैकी बहुतेक पंडि- तांचा यत्किंचितही पूज्यभाव उरलेला नाहीं; पण तसें स्पष्टपणें बोलून दाख विण्याची छाती मात्र त्यांना होत नाहीं; इतकेच नव्हे, तर एखाद्या पंथांतील एखाद्या विक्षिप्त भागासंबंधीं त्यांस बोलावयाचें असल्यास, गुळमुळीत भाषा वापरून आणि विलक्षण द्राविडी प्राणायाम करून, त्यांना आपले म्हणणे अर्ध्या-" कच्च्या भाषेनें सांगावें लागतें. युरोप खंडांत सामान्य लोकमताचें प्राबल्य या प्रकारचें आहे. अशा स्थितीत केवळ सत्यासाठी लोकमताची यत्किंचितही पर्वा न बाळगतां ज्यांनी आर्यतत्त्वज्ञानाचा प्रसार युरोपांत केला, ते मोक्षमुल्लर आणि डॉक्टर पॉल ड्यूसन धन्य होत ! ज्या असामान्य धैर्याने त्यांनीं हैं कार्य युरोपांत संपादिले आहे, त्याच धैर्यानें त्यांनी आमच्या चुकांचेही माप आमच्या पदरांत घालावें अशी माझी इच्छा आहे. प्राचीन तत्त्वरत्नांत पुढें पुढें भेसळ कशी झाली आणि त्याच त्त्वांना प्रत्यक्ष व्यावहारिक रूप देण्यांत आम्ही कसे घसरलों, हैं त्यांनी दाखवावें. सध्याच्या आमच्या विपन्नावस्थेत तर असल्या नरशार्दूलांचीच आह्मांस अधिक गरज आहे. एकीकडे पाहावें तो जुन्याची तरफदारी करणारा एक पक्ष दिसतो. खेड्यापाड्यांतल्या जाखा- ईजोखाईचे पूजाविधी हेसुद्धां यांच्या दृष्टीने मोठ्या शास्त्रांच्या किंमतीचे ठर तात. जुनें म्हणून जें कांहीं सांपडेल तें रत्न असे यांच्या दृष्टीला भासतें. जुन्याची शुद्ध गुलामगिरी पत्करलेला हा पक्ष हिंदुस्थानांत वराच मोठा आहे. या पक्षाकडून दृष्टेि वळवून दुसऱ्या बाजूकडे पहावें, तों एक निराळाच चमत्कार