पान:विवेकानंद.pdf/289

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
डॉ. पॉल ड्यूसन.

२७९


आणि कधीकधीं कित्येक महिनेही निघून जात. ही गोष्ट खुद्द त्यांनीच मला सांगितली. अशा रीतीनें जेथें केवळ घनदाट अरण्य होतें तेथें ज्यांनी मोठा राजमार्ग निर्माण केला, त्यांची धन्य होय असेंच ह्वाटले पाहिजे. हा प्रचंड उद्योग ज्यानें निरपेक्ष बुद्धीनें केला, त्याचे आह्मां हिंदूंवर अनंत उपकार झाले आहेत असें ह्मणणें वावगे आहे काय ? त्यांच्या अनेक लेखांत त्यांनी प्रति- पादन केलेली सर्वच मतें आह्मांस मान्य होणार नाहीत; आणि कित्येक ठिकाणीं तीव्र मतभेद होईल हेही खरें; पण असे असले तरी त्यामुळे त्यांच्या परि श्रमाचें मोल यत्किंचितही उणें होत नाहीं; मतभेद हे नेहमीं होणारच; पण या एका पंडितानें आमच्या पूर्वजांच्या विद्येचा जितका शोध केला, तिचें रक्षण केलें आणि तिचा प्रसार केला, तितकी कामगिरी आह्मांपैकी एकाच्यातरी हातून होण्याची आशा होती काय? कीतींचा अथवा दुसरा कसलाही लोभ अंतः- करणांत नसतां, केवळ प्रेमाला वश होऊन लीन अंतःकरणानें त्यानें ही काम- गिरी बजावली आहे.
 प्राच्य विद्यांचा प्रेमानें अभ्यास करणाऱ्या पिढींत अग्रेसरत्वाचा मान 'ज्याप्रमाणे भट्ट मोक्षमुल्लर यांस आहे, त्याचप्रमाणे त्यांच्या पुढील पिढीत बिनीचा मान देवसेन यांस दिला पाहिजे. आरंभी या विद्यांकडे ज्यांचें लक्ष्य वेधलें गेलें, त्यांनीं भाषासाम्याच्या दृष्टीनेंच या विद्यांचा अभ्यास केला. प्राचीन कालीं कोणत्या भाषा प्रचारांत होत्या, त्यांचा एकमेकींशी संबंध कोणत्या प्रकारचा होता आणि कोणत्या प्राचीन भाषांपासून कोणत्या अर्वाचीन भाषा उद्भवल्या, या विषयांकडेच त्यांनीं अधिक लक्ष्य दिलें होतें; पण यामुळे विचार- रत्नांच्या प्रभेकडे आणि त्यांतील अध्यात्मभागाकडे यांचें दुर्लक्ष्य झालें. मोक्षमुहर यांनी प्रथम यांतील कांहीं रत्ने वेंचून काढून लोकांस दाखविलीं. त्यांच्या भाषापांडित्याबद्दल लोकांची आगाऊच खात्री झाली असल्यामुळे, त्यांनी निदर्शनास आणलेल्या विचाररत्नांकडे लोकांचें चित्त आपोआपच वेधलें. भाषांचें साम्य आणि वैषम्य पाहत बसण्याची गोडी डॉ. ड्यूसन यांस नव्हती. प्रथमपासूनच त्यांचा कल तत्त्वज्ञानाकडे विशेष होता. प्राचीन ग्रीक आणि अर्वाचीन जर्मन तत्त्वज्ञानाचा अभ्यास त्यांनी अगोदरच केला अस ल्यामुळे, आर्यतत्त्वज्ञानाकडे त्यांचें चित्त एकदम वळले. उपनिषग्रंथांच्या अत्यंत खोल भागांत त्यांनी बुडी मारली. अगदी तळापर्यंत पोहोचण्यांत त्यांनीं