पान:विवेकानंद.pdf/291

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
डॉ. पॉल ड्यूसन.

२८१

नजरेस पडतो. या पक्षाच्या मताने आम्ही लोक अगदी कुचकामाचे, आमच्यांत कांहींच अर्थ नाहीं. आमच्या साच्या इतिहासांत नांव घेण्यासारखा एकहीं भाग त्यांच्या दृष्टीने दिसत नाही. आमची समाजरचना आणि धार्मिक विधी यांना एकत्र बांधून दारूच्या धडाक्याने उडविणे शक्य असेल, तर ते कर्मही हे लोक आनंदाने करतील. तत्त्वज्ञान आणि धर्म यांच्या प्राचीन जन्मभूमीची त्यांस यत्किंचितही कीव यावयाची नाहीं.