पान:विवेकानंद.pdf/288

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२७८
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


यामुळे ते एकमेकांचेच पाय तुडवीत सुटले ! पण ही ज्वराची भावना लवक- रच थंडावली, आणि भावी आशेचा अरुणोदय झाला. पौर्वात्य विषयांवर मतें झोंकून देण्याचा काळ आतां राहिला नाहीं. अंगीं गाढी विद्वत्ता आणि अत्यंत कुशाग्र बुद्धि असल्यावांचून या कामाला हात घालणे, म्हणजे आपणच आपलें हंसे करून घेणें आहे, ही गोष्ट पुष्कळांच्या लक्ष्यांत आली. आर्यपरंपरेची नुसती अवहेलना करून तिला तुच्छता आणण्याचा यत्न करणें, हें काम दिसतें तितकें सुरक्षित नाहीं असे त्यांना आढळून आलें. स्वप्नांतही लक्ष्यांत न येणारी गुथें, या आर्यपरंपरेच्या पोटी आहेत अशी त्यांची खात्री झाली.
 या काळानंतर युरोपांत उद्भवलेला संस्कृत भाषेचा विद्यार्थिवर्ग, अधिक लीन वृत्तीचा, अधिक सानुकंप आणि अधिक सुशिक्षित असा आहे. ज्यांच्या अंगीं विद्या बाणली आहे, त्यांची स्थिति “वृक्ष फार लवती फलभारें" अशी होणें हें बाजवीच आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या अंगीं सहानुभूति असावी हॅहीं युक्त आहे. कारण, त्यांची अंतःकरणें ज्ञानरसाच्या आकंठ पानानें तृप्त झालेली असतात. या जुन्या आणि नव्या पक्षाची सांखळी जुळविणारा कुशल कारा-- गीर भट्ट मोक्षमुल्लर हाच होय. दुसऱ्या कोणाही पंडितापेक्षां या वृद्ध आचा- र्याचे आह्मां हिंदूवर अनेक उपकार आहेत. या बहाद्दरानें अत्यंत उत्साहानें तारुण्याच्या भरांत हाती घेतलेले काम नेटानें करून वृद्धावस्थेत ते पूर्ण केले; हैं पाहिले ह्मणजे आश्चर्यानें माझें मन थक्क होऊन जातें. कोणाचीही मदत नाहीं अशा स्थितीत जीर्ण झालेली हस्तलिखितें उकलावयाची, त्यांतली लिपी खुद्द आह्मां हिंदूसही कित्येक वेळां दुर्बोध, आणि त्यांची भाषा अशी की, जिचें ज्ञान होण्यास सारा जन्मही पुरावयाचा नाहीं, अशा स्थितीत ज्यानें एवढा प्रचंड उद्योग हातीं घेऊन पार पाडला, त्याची खरोखरच धन्य होय ! त्याला एखाद्या जाड्या पंडिताची मदत तर नव्हतीच, पण अडक्याचा तीन 'वाला एखादा बुभुक्षित पंडितही त्याला सांपडला नव्हता. 'महिन्याकांठी सात- आठ रुपये खर्च केले तर कोणत्याही विषयांतला एखादा 'विद्वान्' मिळू शकतो; ' अशा अर्थाची एक ह्मण अमेरिकेंत आहे. फार झालें, तर प्रस्ताव- नेंत त्याचे आभार मानावे. अशांपैकीही एखादा पंडित मोक्षमुल्लर यांस मिळाला नव्हता. एखाद्या शब्दाचा अथवा वाक्याचा अर्थ सायनाचार्यांनी काय केला आहे आणि खरा पाठ कोणता, हे शोधून काढण्यासाठी त्यांना कित्येक दिवस ,