पान:विवेकानंद.pdf/287

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
डॉ. पॉल ड्यूसन.

२७७


दुसऱ्या पंडितांच्या दृष्टीनें पूर्वेकडील कोणतीही चीज केवळ त्याज्य. केवळ उपहासास पात्र. पण ज्या भाषेतील विद्येवर टीका करण्याचें व्रत यांनी स्वीका- रलें होतें, त्या भाषेचें यांचें ज्ञानही अपूर्वच होतें; इतकें कीं, जवळजवळ शून्य. • संस्कृताच्या अभ्यासापासून कांहीं फायदा होणार नाहीं अशी त्यांची आगा- ऊच खात्री झाली होती. केवळ कल्पनातरंगांत वाहत गेल्यामुळे, पहिल्या पिढीतील लोकांस संस्कृतविद्येत ज्याप्रमाणें गुलाबाचे ताटवे आणि कस्तुरी ह्रीं जिकडेतिकडे दिसत होतीं, त्याचप्रमाणे या दुसऱ्या पिढीला सर्वत्र त्याज्य भाग दिसूं लागला. पूर्वीच्या सर्व पंडितांवर एकसहा ताशेरा झाडण्याचा क्रम यांनी सुरू ठेवला होता; पण त्यांच्या या प्रयत्नांत खरें तथ्य मुळींच नव्हते; इतकेंच नव्हे, तर हे प्रयत्न धाष्टर्याचेही होते असे म्हटले पाहिजे. तशांतून संस्कृत भाषेच्या पुरस्कर्त्याचें अध्ययन शाकुंतल नाटकाच्या पलीकडे फारसें गेलें नसल्यानें, उलटपक्षाच्या धाटर्याला अधिकच स्फुरण चढलें; आणखी असें कीं, ज्या श्रोतृगणासमोर या हल्ल्याचें काम चाले, त्याचा अधिकार आणि त्याचें संस्कृत भाषेचें ज्ञान किती होते म्हणाल, तर त्या भाषेतील एखादा शब्दही कधीं त्यांच्या कानांवरून गेला नव्हता. संस्कृत भाषेच्या बचावाईट. पणाचा निवाडा करणारे न्यायाधीश या प्रकारचे, आणि वादीप्रतिवादी त्या प्रतीचे ! अशा स्थितीत ज्ञानरसाचा पूर किती वाहत असेल आणि त्यांत कोण वाहून जात असेल, की त्यांत सर्वच गटंगळ्या खात असतील, हें कोणी सांगावें ? साराच गोंधळ ! एका सुप्रभात आम्ही बिचारे अशरण हिंदु लोक जागे होऊन पाहतों, तो काय चमत्कार सांगावा! आमचें आमचें म्हणून ज्या चिजा आम्हीं आजवर उराशी बाळगल्या, त्या साऱ्या चोरीस गेलेल्या ! एक टोळी जी पृथ्वीच्या पोटांतून अचानक उद्भवली, तिने आमच्या साच्या जिनसा पसार केल्या ! दुसरी टोळी आली तिने आमची शिल्पकला लांबवली ! तिसरीनें आमच्या साऱ्या शास्त्रांचे अवशेष पळविले ! आतां आमचें तें काय राहिलें ? धर्म ? छे. तोसुद्धां आतां तिसऱ्यांच्या ताब्यांत गेला. धर्माचा उद्भव प्रथम हिंदुस्थानांत झाला म्हणतां? छे. नांवसुद्धां घेऊं नका. तोसुद्धां तुम्हीं दुसऱ्या कडूनच उसना घेतला आणि आतां लुच्चेगिरीनें वारसदारीचा हक्क सांगतां ! त्या काळी सर्वत्र हीच धामधूम सर्वच विद्वान् आणि सर्वच शोधक. सर्व एका लहानशा जाग्यांत नानाप्रकारचे शोध लावूं लागले! आणि तेथें तर सर्वच अंधार |