पान:विवेकानंद.pdf/286

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२७६
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


करावयाचा हें कांहीं सोपें काम नव्हतें. आमच्या जुन्या पद्धतीच्या विद्यार्थ्यांना जे हाल सोसावे लागतात आणि प्रसंगी उपासमारही होते, तशीच स्थितिः ड्यूसनचीही झाली. पण धीर न सोडतां त्यानें अभ्यास केला आणि पूर्वपरं- परेला अनुरूप अशी खरी विद्याही त्यानें प्राप्त करून घेतली. पंडित पॉल ड्यूसन हे कील येथील विश्वविद्यालयांत अध्यात्मविद्येचे अध्यापक असून, साया युरो- पांत त्यांच्या धवलकीर्तीचा परिमल पसरला आहे. डॉक्टर पॉल ड्यूसन यांचें नांव ऐकलें नाहीं असा हिंदु पंडितही बहुधा क्वचितच असेल ! युरोपांत व अमेरिकेंत संस्कृत भाषेचे पंडित मीं अनेक पाहिले. वेदान्ताची अभिरुचीही त्यांपैकी कित्येकांना आहे. तसेच त्यांच्या बुद्धीची कुशाग्रता आणि त्यांचें संस्कृतावरील निरपेक्ष प्रेम, हीं वाखाणण्यासारखी आहेत हेंही खरें; पण पॉल ड्यूसन ( देवसेन हे त्यांचे आवडतें नांव ) आणि वृद्ध भट्ट मोक्षमुल्लर हेच कायते आर्यभूमीचे आणि आर्यविद्येचे खरे निःसीम भक्त आहेत असे मला वाटतें.. कील येथें या वेदान्त्याची व माझी भेट ज्या दिवशीं झाली, तो दिवस माझ्या स्मृतिपटावर कायमचाच राहील. माझ्या आयुष्यांत अत्यंत आनंददायक असे जे कांहीं प्रसंग घडले, त्यांपैकीच हा प्रसंगही होय. डॉक्टर पॉल, त्यांची पत्नी आणि कन्या यांजबरोबर जर्मनींत कित्येक दिवस मी प्रवास केला; आणि त्यानंतर लंडनमध्येही कित्येक वेळां त्यांची व माझी भेट झाली. या सर्व प्रसंगी मला अपूर्व आनंदाचा लाभ झाला.
 संस्कृतविद्येचा प्रसार युरोपांत झाला त्यावेळी अगदी आरंभी ज्यांनी या अभ्यासास सुरुवात केली, त्यांनी तो अभ्यास विशेष कुशाग्र बुद्धीने केला असे म्हणतां येत नाहीं. हा अभ्यास बहुतांशी त्यांच्या केवळ लहरीप्रमाणें झाला. त्यांचे ज्ञान अगदी कोर्ते; आणि तसल्या अर्ध्याकच्च्या ज्ञानापासून मोठे फळ मिळविण्याची आकांक्षा त्यांनी धरली होती. यामुळे त्यांजजवळ जें कांहीं थोडें ज्ञान होतें, त्याचा शक्य तितका मोठा बडेजाव त्यांनी करून दाखविला. संस्कृतविद्येचा नवीनपणाचा परिणाम त्यांच्या कल्पनेवर अधिक झाला अस ल्यामुळे, लहानसहान गोष्टींसही त्यांनीं वाजवीपेक्षां अधिक महत्त्व दिले. शाकुंतल नाटक म्हणजे हिंदुतत्त्वज्ञानाचा मोठा ग्रंथ, असेही म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. त्या काळी असे युरोपीय पंडित थोडे होते असें नाहीं; पण या लाटेला अटकाव करणारी दुसरी प्रतिस्पर्धी लाट • लवकरच उत्पन्न झाली. या