पान:विवेकानंद.pdf/285

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
डॉ. पॉल ड्यूसन.

२७५


सिगामण जळणाच्या दिव्यापुढे रात्रीच्या रात्री बसून ते हस्तलिखित पोथ्या वाचतात. या दिव्यांचा उजेड तर इतका प्रखर असतो, की अलीकडल्या युरोपीय विद्यार्थ्यांची थोड्याच दिवसांत आंधळीकोशिंबीर व्हावयाची. एखाद्या दुर्मिळ हस्तलिखिताकरितां अथवा एखाद्या महापंडिताच्या भेटीकरितां शेंकडों मैल पायांनी चालत जावयाचे, आणि उदरनिर्वाहाचे साधन म्हणजे चौपदरी, हेच. अशा दशेंतही, त्यांचे मन त्यांच्या अभ्यासाच्या विषयाबाहेर कधीही भटकत नाहीं; हें आश्चर्य नव्हे काय ? असा अभ्यास करतांकरतां कित्येकांचे काळ्यांचे पांढरे झाले, तरी अभ्यास अजून चालू आहेच! परमेश्वरकृपेने असले विद्येचे खरे भोक्ते, आजच्या स्थितीतही आमच्या देशांत आढळतात ही मोठ्या भाग्याची गोष्ट आहे. आमच्या सध्याच्या स्थितीतही ज्या विद्येबद्दल आम्हांस यथार्थपणे अभिमान वाटतो, ती विद्या अशाच पद्धतीने शिकलेल्या मनुष्यांनी, इतक्या परिणतावस्थेस नेऊन पोहोंचविलेली आहे. आर्यभूमीच्या अशाच पुत्रांनी ही कामगिरी करून ठेवलेली आहे. उलटपक्षी हजारों रुपयांचा खर्च करून, चालुकाळी मिळणारी अनेक प्रकारची मदत घेऊन, आणि कोणत्याही प्रकारची अपेष्टा न सोसतां, आज जे आमचे विद्यार्थी विश्वविद्यालयाचे शिक्के घेऊन बाहेर पडतात, त्यांची विद्वत्ता आणि ही प्राचीन पद्धतीची विद्वत्ता यांची तुलना केली, तर काय आढळून येते ? आपला नित्याचा अनुभवच या प्रश्नाचे चोख उत्तर देईल. विद्येसंबंधीं आर्यावर्ताची जी ख्याती साच्या जगात एके काळीं होती, तीच आजही असावी अशी इच्छा आजच्या विद्यार्थिवस असेल, तर ते काम चालू शिक्षणपद्धतीने होणे नाही. कोणत्याही प्रकारची आशा चित्तांत न धरतां जे श्रम संस्कृतविद्येचे विद्यार्थी करतात, त्याचप्रमाणे अर्वाचीन विद्यार्थ्यांनी निरलसपणे आणि अहेतुक चित्ताने त्यांचा कित्ता गिरविला पाहिजे. खरी विद्वत्ता अंगीं मुरण्यास, अनासक्तता, अत्यंत उत्साह आणि कोणत्याही अडचणी सोसण्याची शक्ति, हीं आवश्यक आहेत. दुस-या साच्या राष्ट्रांस जर्मनी आज मागे सारूं लागला आहे याचे कारण तरी हेच. अशा प्रकारचा विद्यार्थिवर्ग आज जर्मनीत आहे. पृथ्वीतील साच्या राष्ट्रांत जर्मनीने आज अघाडीची जागा मिळविली, ती अशा विद्यार्थीिवर्गाच्या जिवावरच मिळविली आहे. असो,
 प्रारंभी सांगितल्याप्रमाणे पॉल ड्यूसन याला संस्कृतविचेची गोडी लागली, आणि त्या भाषेचा अभ्यास करावयाचा असा निश्चय त्याने केला. हा अभ्यास