पान:विवेकानंद.pdf/284

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२७४
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


परिणाम पॉल ड्यूसन याजवर झाल्यावांचून राहिला नाही. त्याला त्या भाषेने पुरते मोहून टाकले. व्याख्यान संपल्यावर पॉल घरीं आला; पण रात्रभर त्याच्या मनांत ती भाषा घोळत राहिली. त्याच्या चित्ताला जी तळमळ लागली, तिने त्याची झोंपही उडवून नेली. त्या दिवसापर्यंत जी भूमि त्याला सर्वथैव अज्ञात होती, त्या भूमीच्या एखाद्या सुंदर भागाचे दर्शन आपणांस होत आहे असे त्याला वाटले. अनेक देशांची अनेक प्रकारची चित्रे त्याने पाहिली होती; पण या नव्या चित्रांतील रंगांच्या मिश्रणाने त्याचे चित्त आनंदांत आणि आश्चर्यात बुडून गेलें ! हे चित्र त्याला केवळ अपूर्व वाटलें.
 पॉल ड्यूसन हा तरतरीतपणाबद्दल नावाजलेला विद्यार्थी होता. तो मोठा पंडित होईल, आणि कीर्तीचाच नव्हे तर विशेषतः द्रव्याचा लाभ करून घेईल अशी त्याच्या आप्तेष्टांस फार आशा होती. या त्यांच्या आशेचा भंग होण्याची वेळ आली काय ? आजचे व्याख्यान त्या बिचा-यांच्या आशेच्या रस्त्यांत आडवे पडलें. पॉलला ध्यानी, मनी, स्वप्नीं, संस्कृतावांचून कांहीं दिसेना. त्या वेळच्या युरोपीय पांडितांपैकी बहुतेकांच्या कानांवरून त्या भाषेचे नांवही गेले नव्हते. त्या भाषेच्या अध्ययनाने द्रव्यलाभाची यात्किंचित् आशा आज सुद्धा नाहीं हें मीं पूर्वी सांगितलेच आहे; पण पॉलच्या मनांत हैं। वेड इतकें पक्के भरले, की त्याला संस्कृत भाषेवांचून दुसरे कांहीं सुचेनासेंच झालें. आम्हां भारतवर्षीयांना या मनःस्थितीचे रहस्य सध्यातरी समजण्यासारखें नाहीं. ज्यांत द्रव्यलाभ नाहीं ती विद्या शिकण्याची खटपट करावयाची? “शांतं पापम् । शांतं पापम् ।” द्रव्यलाभाच्या आशेशिवाय एखाद्या विद्येच्या मागे लागणारा वेडा पीर या दुनियेत असेल, असे आम्हां लोकांस तरी वाटत नाहीसे झाले आहे; पण आजसुद्धा असे वेडे पीर आमच्यांत कांहीं थोडेथोडके आहेत असे नाही. काशी किंवा नडिया यांसारख्या ठिकाणीं, केवळ संस्कृतविद्येचा अभ्यास करणारे लोक-विशेषेकरून संन्यासी-आजही पुष्कळ आढळतात. यांत कांहीं तरुण आणि कांहीं अगदीं वृद्धही असतात. अशा वयांत संस्कृतविद्येचें अध्ययन करून द्रव्यप्राप्ति होणे शक्यच नाहीं. तशांतून या विद्याथ्र्यांची सांपत्तिक स्थिति पाहिली, तर तीही समाधानकारक असते असें नाहीं. युरोपीय विद्येचें अध्ययन करणा-या आमच्या हिंदु मुलांची राहणी आणि या विद्यार्थ्यांची राहणी यांत जमीनअस्मानाचे अंतर आहे. तेलवातीच्या