पान:विवेकानंद.pdf/282

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२७२
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


भट्टाला एकीकडे शिव्या द्यावयाच्या आणि दुसऱ्या बाजूनें त्यांच्याच कच्छपीं लागून त्यांच्या मार्फत पाश्चात्य लोकसमूहाला आपल्या भजनीं लावावयाचें, आणि विश्वज्ञानाचा गड्ढा कायतो आपणांजवळच आहे असे भासवावयाचें; या हातचलाख्या सदरहू लेखकास माहीत असल्या पाहिजेत. असले अजब ज्ञान सातासमुद्रांत दडवून ठेवल्यासारखें गुप्त ठेविले जाणार हे ऐकून कोणाचाही जीव खालीं पडल्यावांचून राहणार नाही. आंव्याचीं झाडें उत्पन्न करण्याची फकीरी विद्या अथवा गारुड्याचे खेळ हीच कायती हिंदूंची ब्रह्मविद्या असा समज पाश्चात्य राष्ट्रांत उत्पन्न करण्याचे कार्य मात्र थिऑसफीनें चोख बजा- विलें आहे हें कबूल केले पाहिजे. हिंदुधर्माची वाढ पाश्चात्त्यदेशांत होण्याला थिऑसफीनें जी काय विनमोल मदत केली ती हीच !
 तथापि थिऑसफीनेंही सर्व देशांत सद्यःफलदायी अशी एक काम- गिरी करून ठेविली आहे. प्रोफेसर कॉक यांनीं क्षयरोगावर एक पिचकारीचें औषध तयार केले आहे. त्या औषधाची पिचकारी रोग्याच्या फुप्फुसांत मारिली तर त्यांतले रोगजंतू निराळे करतां येतात असें म्हणतात. त्याच- प्रमाणे समाजाच्या फुप्फुसांत थिऑसफीच्या औषधानेंही एक कामगिरी बजा- विली आहे. ती ही कीं, अध्यात्मविद्येचे खरे आणि निःसीम भक्त कोण व ढोंगी, गारुडी, भ्रमिष्ट व अवनत कोण यांची निवड करण्यास सुलभ झाले आहे.