पान:विवेकानंद.pdf/281

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
-खंड.]
थिऑसफीसंबंधीं कांहीं स्फुट विचार.

२७१


पिशाचें वश होतीं, त्या ऐवजी येथें महात्म्यांकडून संदेश येतात. अमेरिकें- तील झाडाचें कलम येथे आणून लाविल्यावर त्याला जीं नवीं फळे आली तीं ह्रींच.
 'ॲडव्होकेट' पत्रांत लेख लिहिणाराला या सर्व गोष्टींची माहिती असे- लच असें आम्ही म्हणत नाहीं; पण आमचें हिंदु राष्ट्र आणि त्याचे थिऑस- फिस्ट हे एकच आहेत असे भासविण्याची खटपट मात्र त्यानें करूं नये. थिऑसफीचा जो देखावा दिसत आहे, त्यांतून आरपार नजर आम्हीं फेंकली आहे. आमच्या हिंदु राष्ट्राला या देखाव्याची वरोबर किंमत आरंभापासूनच कळून आली आहे. मॅडॅम ब्लॅव्हॅट्स्की हिनें स्वामी दयानंद सरस्वती यांस यां जाळ्यांत गुंतविण्याचा यत्न केला होता; पण त्या महापुरुषाने तिला झिट्का- रून दिल्यापासून आमच्यांतील बहुतेकांस या विद्येचें खरें रहस्य कळून चुकले आहे.
 'अॅडव्होकेट' मधील लेखक थिऑसफीला कितीही भाळला असला तरी या कलियुगांतही अनेक सद्गुरू खुद्द आमच्यांत आहेत आणि आम्हां लोकां- नाही अध्यात्मविद्येचें ज्ञान पुरेसें आहे, हे त्यानें नीट ध्यानांत धरावें. अध्यात्म- विद्येसाठी रशियन किंवा अमेरिकन भुतांच्या ओंजळीनें पाणी पिण्याची आम्हांला यत्किंचितही गरज नाहीं.
 ही लेखमाला हिंदु आणि हिंदुधर्म यांना अत्यंत अपमानकारक आहे असें • आम्ही स्पष्ट म्हणतों. पाश्चात्त्य देशांतून आगबोटी भरून धर्माची पोतीं इकडे आणण्याची आम्हां हिंदूंना गरज नाहीं आणि इच्छाही नाहीं हें असल्या लेखकांनी खूप ध्यानांत ठेवावें. दुसन्या हजारों वस्तू त्यांजकडून घेण्यांत जो अपमान आम्हांस सोसावा लागत आहे, त्यांत या नव्या अपमानाची आणखी भर कशाला ?
 बाहेरून धर्म यावा अशी जर कोणाची स्थिति असेल, तर ती पाश्चात्यां- चीच आहे. ती गरज आजपर्यंत आम्हीं पुरी पाडीत आलोंच आहों. थिऑ- सफीनें तिकडे जर कांहीं कार्य केले असलेच तर तें हेंच कीं हिंदुधर्माच्या वाटेत तिनें डोंगर मात्र उभे करून ठेविले आहेत. तिनें ज्या अनेक प्रकारच्या हातचलाख्या तिकडे केल्या, त्यामुळे हिंदूंच्या धर्माच्या प्रसाराला अडथळा मात्र झाला. एडविन आर्नोल्ड सारख्या कवीला अथवा मोक्षमुल्लरसारख्या