पान:विवेकानंद.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१८

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय

तरी असणे-अस्तित्व-हें एक रूप. आणि ते ‘अमुक' असा नामरूपाचा आरोप मी त्याजवर करतों हे त्याचे दुसरें स्वरूप. अशा रीतीने विश्वांतील केवळ जड़पदार्थांचाच विचार करावयाचा ह्मटले तरी, शेवटीं अध्यात्मविद्येचा आधार कसा घ्यावा लागतो हे आपल्या लक्ष्यांत येईल; आणि भौतिकशास्वांचे शेवटचे सिद्धांत आणि अध्यात्मसिद्धांत एकच आहेत अशी आपली खात्री होईल. ज्याचा शोध लावण्यासाठी आज सारीं शास्त्रे धडपडत आहेत त्याचा शोध आमच्या वेदान्तानें पूर्वीच लावून ठेविला आहे.