पान:विवेकानंद.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड] ।

वेदान्त आणि मानवी संस्कृति.

१७

दिसून येईल. परमाणु या शब्दाची व्याख्या भौतिक शास्त्रांनी कशी केली आहे ती पहा. ज्याला लांबी नाही आणि रुंदीही नाही असा कण, अशी त्यांची व्याख्या आहे. आतां अशा प्रकारचा कण आपल्यापाशी असलेल्या इंद्रियांच्या साधनांनीं आपणांस गम्य होणार नाही हे उघड आहे. पण लांबीरुंदी नसलेला कण, लांबीरुंदी असलेल्या पदार्थांची उत्पत्ति करतो असे ताँच शास्त्रे आपणांस सांगतात! दुसरे असे की दोन परमाणू एकत्र होतात तेव्हां त्यांचा एकजीव करणारा मध्यस्थ कोणी तरी असला पाहिजे. हा मध्यस्थ कोण? हा मध्यस्थ तिसरा एखादा परमाणु आहे अशी कल्पना केली तर पूर्वीच्या दोन परमाणूंच्या आघाताचा परिणाम या नव्यावर कोणत्या प्रकारचा झाला हा प्रश्न शेवटीं शिल्लक उरतोच. असाच प्रकार प्रत्येक भौतिक शास्त्राच्या मुळाशी तुह्मांस आढळून येईल. भूमितिशास्त्र घ्या. भूमितिशास्त्राने बिंदु या शब्दाची व्याख्या काय केली आहे ती पहा. ज्याचे भाग पाडतां येत नाहींत अथवा ज्याला परिमाण नाहीं तो बिंदु. त्याचप्रमाणे जिला लांबी मात्र आहे पण रुंदी नाहीं ती रेषा. आतां रेषा अथवा बिंदु यांची व्याप्त आपल्या बायेंद्रियसाधनांनीं आपणांस कधी तरी प्रतीत होणार आहे काय? त्यांची व्याप्ति बायेंद्रियांपलीकडच्या मनाने मात्र जाणावयाची आहे. ह्मणजे जड भौतिकशास्त्राला सुद्धां मानसशास्त्राचा आधार घ्यावा लागतो असे सिद्ध होते. आपल्या विचारांची परंपरा आपण अशाच रीतीनें लांबविली, तर जगांतील प्रत्येक वस्तूला जे कांहीं स्वरूप आहे ते आपणच आपल्या मनाने दिले आहे असे आपणांस आढळून येईल. जगांतील प्रत्येक वस्तूस तिचे स्वतःचे असे कांहीं स्वरूप नसून आपण आपल्याच मनाने तिच्यावर एखाद्या विशिष्ट स्वरूपाचा आरोप केला आहे असे आपणांस आढळून येईल. आपण आजच्या स्थितीत एखाद्या वस्तूचे काही विशिष्ट रूप पाहत असतो. पण आपल्या सध्याच्या इंद्रियांहून निराळ्या अशा एखाद्या इंद्रियाची प्राप्ति आपणांस झाली तर त्याच वस्तूच्या स्वरूपांत आपणांस भिन्नता दिसणार नाही काय? आजच्या स्थितीत माझ्या समोरील पदार्थ खुर्ची आहे असे मी ह्मणतो; पण उद्या माझ्या इंद्रियांत कांहीं कारणानें फेरबदल झाला तर त्याच पदार्थास मी कांहीं निराळेच ह्मणेन हे उघड आहे. यावरून दृश्य पदार्थाचे स्वरूप द्विधा आहे असे आपणांस आढळून येईल. माझ्या इंद्रियांच्या बाहेर कांहीं  स्व. वि. खं, ३-२.