पान:विवेकानंद.pdf/277

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
उपोद्धात.

२६७


अशा स्वरूपाचें आहे की, त्यांत असल्या गडवडीचें आणि प्रदर्शनाचे कामच नाहीं. त्या कार्याचा संबंध मूक अशा आध्यात्मिक वस्तूंशी असतो. रात्रीं पडणाऱ्या दंवाचा आवाज जसा कोणाला ऐकूं येत नाहीं, त्याचप्रमाणे आमच्या या आर्यमातेचा सर्व कारभार अगदीं नि:शब्द होत असतो. त्याच्याबद्दल कोठेंही कांहीं गडबड ऐकूं यावयाची नाहीं; पण असल्या निःशब्द कार्यातच या पृथ्वीवरील अत्यंत सुगंधी फुले फुलतात. हें कार्य स्वभावतःच केवळ शांत- तारूप असल्यामुळे अनेकप्रकारच्या अनुकूल परिस्थिती त्यासाठी जमून याव्या लागतात आणि अशी परिस्थिति जमली ह्मणजे तिच्या कार्याला बाहेर देशींही सुरवात होते. खुद्द आर्यावर्तासंबंधानें म्हणाल तर हें कार्य येथें अखंड चालू आहे. तार्तर, इराणी, ग्रीक किंवा अरब लोकांनीं राज्यलोभानें ज्या ज्या वेळीं या भूमीचा संबंध परराष्ट्रांशी आणिला, त्या त्या वेळीं अध्यात्मविद्येचा लोंढा जगभर पसरला गेला, ही गोष्ट इतिहासज्ञांस विदित असेलच. आज आपणापुढेही असाच प्रसंग आहे. समुद्रावर आणि जमिनीवर इंग्रजांनी दळ-- णवळणाचे मोठमोठे राजमार्ग खुले केले असून त्या लहानशा बेटांतील लोकांच्या अजब कर्तवगारीमुळे पुन्हा एकवार आपला जगाशी संबंध आला. आहे; आणि अशा स्थितींत आमच्या आर्यभूमीच्या कार्याला पुन्हा एकवार प्रोत्साहन मिळावें हें रास्तच आहे. हे माझे शब्द आपण नीट ध्यानांत धरा. आतां नुकता कोठें आरंभ झाला आहे. याहून मोठ्या गोष्टी अद्यापि आहेत. सध्या चालू झालेल्या कार्याचा परिणाम हिंदुस्थानाबाहेर काय होईल हें नक्की जाणणे माझ्या अटकळीबाहेरचें आहे. तथापि अत्यंत निश्चयात्मक अशी एक गोष्ट मात्र मी सांगतो. सध्यांच्या जडवादाच्या गर्तेतून आपला. उद्धार व्हावा यासाठीं लक्षावधि- होय लक्षावधि - लोक चातकासारखे वाट पाहत बाहेरदेशीं राहिले आहेत. कनककामिनींचें चालू युग त्यांना त्या गर्ते- कडे झपाट्यानें ढकलून नेत आहे. तिकडच्या अनेक सामाजिक सुधारकांस आतां हें पक्के कळून चुकलें आहे की, आपल्या अनेक सुधारणांना आध्यात्मिक बळ प्राप्त व्हावयाचें असेल, तर अत्युच्च प्रतीच्या वेदान्ताच्या साहाय्यावांचून तें होणें नाहीं. असो. यासंबंधी एक स्वतंत्र लेख शेवटीं मला लिहावयाचा आहे. याकरितां देशांतल्या देशांत जो कार्यभाग आपणांस कर्तव्य आहे, त्याकडे आधीं वळावें हें इष्ट आहे.