पान:विवेकानंद.pdf/276

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६६
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


धनानें नव्हे आणि संततीनेंही नव्हे, तर केवळ त्यागानेंच अमृतस्थितीची प्राप्ति होते. तेव्हांपासून आम्ही सान्या जगाला आव्हान करून या तत्त्वाचें मिथ्यात्व सिद्ध करा म्हणून सांगत आहों. अनेक मानवशाखांनी या आमच्या आव्हानाचा स्वीकार केला आणि तृष्णातृप्तीच्या उत्तरानें हें कोडे सोडवि- ण्याचा यत्न करून पाहिला. पूर्वी ज्यांनी हा यत्न करून पाहिला, त्यांचा आज कोठें मागमूसही राहिला नाहीं. तृष्णातृप्तीचें उत्तर आम्हांस देण्याच्या नादीं पडून त्यांनीं जो यत्न केला, त्यामुळे उत्पन्न झालेल्या दुष्टत्वाच्या आणि दुःखाच्या झंझावातांत तीं राष्ट्रेच नामशेष झाली. कनककामिनीच्या मागें लागून दुसऱ्या कशाची प्राप्ति होणार ! जीं राष्ट्रे आज हाच यत्न फिरून करीत आहेत, त्यांचा पाया पोखरून गेला आहे आणि तीं आज पहूं की उद्यां पहूं, इतकाच विचार करीत आहेत. अखेरीस युद्ध कीं अखेरीस शांतता हा प्रश्न अजून भिजत पडला आहे. शेवटीं मेंदूचा जय होईल की स्नायूचा जय होईल, हे अजून कोणीं सांगितलें नाहीं. शेवटीं संसार की संन्यास कामाला येईल, याचें उत्तर अजून कोणीं दिलेलें नाहीं. आपण आपले कोडे सोडवून स्वस्थ बसलो आहों. सुखपर्वतावर आरूढ झालों असतां अथवा दुःखसमु- द्राच्या तळाशीं गेलों असतांही आपण आपल्या ध्येयास चिकटून बसलों आहों. कालाच्या अंतापर्यंत त्यालाच चिकटून बसण्याची आपली इच्छा आहे. आपले उत्तर एकच. त्याग - कर्मसंन्यास -हेच.

 जीवनक्रमाची आर्यांची रचना याच तत्त्वास अनुलक्षून झालेली आहे. त्यांच्या साच्या साहित्याचें मंथन केलें, तर त्यांत हेंच सार सांपडावयाचें. साया जीवितयात्रेचा हेतु एकच. नराचा नारायण कसा होईल, या एकाच प्रश्नाचें उत्तर आर्यभूमी अनेक प्रकारांनीं देत आहे. हा तिचा क्रम अखंड चालू आहे. राज्य मोंगलांचें असो, तुर्काचें असो अगर इंग्रजांचें असो, त्याची फिकिर तिला नाहीं. तिचा एकच उद्योग अखंड चालू आहे.

 आर्यराष्ट्राच्या इतिहासांत असा एकही काळ सांपडावयाचा नाहीं, कीं, ज्यांत जग हालवून सोडणारा कोणीच ब्रह्मनिष्ठ येथें नव्हता. असा काल कोणी मला दाखवून द्यावा. आतां एवढी गोष्ट खरी की त्यांच्या आगमनाप्रीत्यर्थ कोणीं कर्णे वाजविले नसतील अगर शिपायांची सलामीही झडली नसेल. तिचें कार्य