पान:विवेकानंद.pdf/275

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड ]
उपोद्धात.

२६५


उच्च प्रतीच्या देवाधिदेवांपासून तो गवताच्या पातीपर्यंत सर्वांचा समावेश एक मानवी अंतःकरण करूं शकते आणि स्वतः अनंतरूप राहतें, ही गोष्ट प्रथम येथेंच सिद्ध झाली. 'सर्व विश्व मीच आहे, त्यांत कोठेंही खंड नाहीं, त्यांत उडणारी प्रत्येक नाडी माझीच नाडी आहे' अशा प्रकारचा अभ्यास मनुष्य- प्राण्यानें प्रथम याच भूमीत केला.
 हिंदुस्थानदेश अवनत झाला आहे, अज्ञानग्रस्त झाला आहे अशा मोठ- मोठया आरोळ्या आपणा सर्वोच्या कानांवर आजपर्यंत अनेकवेळां आल्या आहेत. ही गोष्ट खरी आहे अशी माझीही समजूत एकाकाळीं होती. पण आज ? अनुभवाच्या उच्च शिखरावरून केलेल्या अवलोकनानें, अननुकूल पूर्वग्रहांचें डोळ्यांवरील पटल गळून पडल्याने आणि परकीय देशांच्या भडक रंगांतील चित्रांची वस्तुस्थिति पाहिल्यानें माझी पहिली समजूत चुकीची होती हैं मी कबूल करतों. माझा सारा अभिमान बाजूला ठेवून अवनतशिरानें मी सांगतों कीं, माझ्या मातृभूमीसंबंधाची माझी समजूत अगदीं चुकली होती. हे आर्याच्या पवित्र भूमि, अवनतीनें तुला कधीं स्पर्शही केला नाहीं ! हजारों राजदंड येथें मोडले गेले आणि सामर्थ्य आणि सत्ता हीं चेंडूसारखी या हातांतून त्या हातांत उडालीं, पण राजदंडाचा स्पर्श येथें लहानशा जन- समूहास मात्र होत होता. त्याचा परिणाम एकंदर जनसमूहावर फारसा कधीच झाला नाहीं. त्याच्या चालू प्रवाहांत कधीं खंड पडला नाहीं. हा प्रवाह कधीं मंद, तर कधीं चंड आणि कधीं स्वप्नासारख्या अर्धवट स्थितींत तर कधीं संपूर्ण जाग्रदवस्थेंत होता. अत्यंत दैदीप्यमान अशी कित्येक शतकें माझ्या नजरेस पडतात त्यावेळी माझी दृष्टि दिपून जाते, आणि हृदय कंपा- यमान होतें. या सान्या सांखळीत एखादा दुवा मलिन दिसला तर दुसरा अत्यंत तेजोमय दिसतो. अहाहा! पहा, ही माझी माता आपल्या धीरोदात्त गतीनें एक एक पाऊल पुढेंच टाकीत आहे. तिच्या गतीला अडथळा कर- ण्याचें सामर्थ्य कोणाला आहे ! मनुष्याला त्याच्या पशुवृत्तींतून बाहेर ओढून स्वानंदसाम्राज्याच्या सिंहासनावर बसवावयाचें हेंच तिचें इष्ट कार्य आहे. हें इष्ट कार्य ती करीत आहे आणि तिच्या कार्यात विघ्न करण्याला या जगांतच काय, पण स्वर्गात अगर इतर कोठेंही कोणी जन्मास आला नाहीं !!
 माझ्या प्रिय देशबांधवांनो, उपनिषत्कालापासून साच्या जगापुढे आपण एक सूत्र मांडिलें आहे. ‘न धनेन न प्रजया त्यागेनैकेन अमृतत्त्वमनाशुः ।'