पान:विवेकानंद.pdf/272

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६२
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


वेगळी आहे. काळाच्या ओघावरोवर स्मृती बदलल्या पाहिजेत. या कायद्या बद्दल आतां शंका राहिलेली नाहीं.
 ३९. वेदान्तधर्मांचा प्रसार एकट्या हिंदुस्थानांतच न करता तो बाह्य देशींही केला पाहिजे. आमच्या विचारांनी परकीयांच्या मनोघटनेंत प्रवेश केला पाहिजे. हें काम लेखांनी न होतां मनुष्यांमार्फत झाले पाहिजे.
 ४०. कलियुगांत दान हेंच खरें कर्म आहे. कर्मानें पूर्वशुद्धि झाल्यावांचून ज्ञानप्राप्ति होणें नाहीं.
 ४१. ऐहिक आणि आध्यात्मिक ज्ञानाचें दान.
 ४२. संन्यास - संन्यासी - राष्ट्राची मागणी.

उपोद्धात.


 माझ्या प्रिय देशबांधवांनो, परकीय राष्ट्रांना मीं दिलेला संदेश धीटपणाचा असेल, तर तुम्हांस द्यावयाचा संदेश त्याहूनही अधिक धीटपणाचा आहे. प्राचीन आर्यभूमीचा संदेश नवीन पाश्चात्य राष्ट्रांस पोहोचविण्याच्या कामांत मीं आपली शिकस्त केली. हे कार्य माझ्या हातून वरें घडले की वाईट घडले, याचा निवाडा भविष्यकाल खचित करील. पण भविष्यकालाच्या या प्रचंड ध्वनीचा सूक्ष्म पण स्पष्ट नाद आजच ऐकूं येऊं लागला आहे. हा नाद दिवसें दिवस बळावत आहे. भविष्यत्कालीं वनणारें आर्यराष्ट्र सध्याच्या हिंदुस्थानाला जो संदेश देत आहे त्याचा हा पूर्वध्वनि आहे.
 ज्या अनेक मानवशाखांचें अवलोकन मीं केले, त्यांत अनेक प्रकारच्या आश्रर्यजनक संस्था, कौतुकास्पद चालीरीती आणि सत्ता व सामर्थ्य यांचें प्रदर्शन हीं नजरेस पडण्याचें भाग्य मला प्राप्त झालें. यांत एक गोष्ट मला विशेषेकरून आढळली, ती ही कीं, चालीरीती, संस्कृती आणि सामर्थ्यप्रद - र्शन यांत बाह्यतः अनेक प्रकार दिसत असले, तरी त्यांच्या पोटांतील मानवी अंतःकरण एक रूपाचेंच आहे. त्याचें रूप सर्वत्र सारखेंच असल्याचा प्रत्यय येतो. एकाच प्रकारच्या आनंदानें अथवा दुःखानें तें आनंदी अथवा कष्टी होतें.. त्यांतील सामर्थ्य अथवा दुवळेपणा यांचे स्वरूप सर्वत्र एकसारखेच आहे.
 त्याच प्रमाणे चांगले आणि वाईट हीं सुद्धां एकाच ठिकाणी नांदतात असे. सर्वत्र आढळून येतें. या दोहोंमुळे समाजाचा ताजवा समतोल राहिला आहे;