पान:विवेकानंद.pdf/271

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
आर्यावर्ताचा जगाला संदेश.

२६१


‘ण्याची बुद्धि यांचा उदय होतो. याच्या तडाक्यांत सांपडलेली राष्ट्रे जितक्या झपाट्याने उदयाला आली, तितक्याच झपाट्याने अस्तही पावलीं.
 ३०. हिंदुस्थानाने वरील अडचणींस चोख उत्तर दिलें * एकं सद्विप्रा बहुधा वदति ।” यापुढे जी कांहीं संस्कृतीची वाढ आर्यावर्तीत झाली तिचे ब्रीदवाक्य हेंच. सा-या कमानीतला मध्यवर्ती धोंडा हाच.
 ३१. याचा परिणाम वेदांत्याची अत्यंत आश्चर्यजनक सहिष्णुता.
 ३२. मग आज मुख्य कर्तव्य काय ? या निरनिराळ्या मूलतत्त्वांचा नाश होऊ न देता त्यांचा एकमेळ करावयाचा आणि त्यांची एकी करावयाची.
 ३३. ज्या धर्माची इमारत एखाद्या व्यक्तिविशेषाभोंवतीं बांधली गेली असेल, अशा धर्माकडून ही कामगिरी होणे शक्य नाही. मग तो व्यक्तिविशेष सामान्य मनुष्यवर्गातील असो अथवा स्वर्गीय असो.
 ३४. अद्वैतमताचे याच दृष्टीने अत्यंत महत्त्व आहे. हे तत्त्वानुगामी आहे; व्यक्त्यनुगामी नाही. असे आहे, तथापि संसारी आणि एकांतिक भक्त या दोघांसही त्याने सारखेच कर्मस्वातंत्र्य दिले आहे.
 ३५. सर्व काल हे असेच चालू आहे. या दृष्टीने पाहतां आमचे पाऊल एकसारखे पुढेच पडत आहे. मुसलमानी सत्तेच्या अवधींतील अवतारी पुरुष.
 ३६. पूर्वकालीं आपली दिशा काय आहे याची जाणीव आम्हांस पूर्णपणे होती आणि सध्या ही जाणीव नष्ट झाली आहे. केवळ या दृष्टीने पाहतां आमचे पतन झाले आहे.
 ३७. भविष्यकाळी हे सर्व जुळून येणार आहे. एकाच शाखेच्या वर्चस्वामुळे कांहीं थोडासा काल तरी राष्ट्राचा विलक्षण उत्कर्ष पूर्वी घडून आला. येथे आतां जी एकीकरणक्रिया चालू आहे आणि निरनिराळ्या शाखा आप्तपणाच्या संबंधाने आणि समानकल्पनांनी एकत्र मिसळत आहेत, त्यायोगे पुढे जी भव्य राष्ट्रीय इमारत उठणार आहे, तिचा नकाशा माझ्या मनश्चक्षेपुढे दिसत आहे. भविष्यकाळचें आर्यावर्त म्हणजे तारुण्यांतील जोमाने मुसमुसलेले आणि पृथ्वींतील एकंदर राष्ट्रपंक्तीच्या मुकुटमण्याच्या जागी बसण्याच्या योग्यतेचे होईल. असे असूनही सर्वांत अत्यंत जुने असे राष्ट्रही तेच राहील.
 ३८. हा मार्ग आम्ही कसा चालावा ? स्मृतिशास्त्रांच्या आधारानें उत्पन्न झालेल्या चालीरीती या मोठ्या आडकाट्या आहेत; पण श्रुतींची गोष्ट मात्र अगदी