पान:विवेकानंद.pdf/270

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६०
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


ब्राह्मणत्व हैं इतरांस आदर्शवत् झाले. संस्कृतींच्या निरनिराळ्या परिमाणांचें, व त्याचप्रमाणे समाजरचना आणि राज्यरचना यांचेही ध्येय ब्राह्मणत्व हेच..
 १९. आर्यावर्ताचें अखेरचें साध्य ब्राह्मणत्व.
 २०. वतनवाडी केली नाहीं. अहंकार बाळगला नाही. कोणत्याही राजाला अथवा कायद्यांना नमून राहिले नाहींत. नीति हाच राजा आणि कायदा.
 २१. वंशपरंपरा ब्राह्मणत्व - अनेक शाखांनी प्रयत्न करून पूर्वी ब्राह्मणत्व मिळविले आणि सध्यांही मिळवीत आहेत.
 २२. ज्यांनीं खरीं महत्कृत्यें केली, त्यांनी कसलाच हक्क सांगितला नाहीं... आळशी आणि कवडीमोल लोकांनी हक्कांची भांडणें केली.
 २३. ब्राह्मणत्व आणि क्षत्रियत्व यांचा अधःपात. कलियुगांत ब्राह्मण मात्र उरतील असें वर्णन पुराणांत आहे. हे म्हणणें अक्षरश: खरें आहे; दिवसें- दिवस त्याचा खरेपणा अधिकाधिक उघड होत आहे; तथापि ब्राह्मणही अगदींच थोडे उरले आहेत, आणि तेही फक्त हिंदुस्थानांत.
 २४. ब्राह्मण व्हावयास मध्यंतरी क्षत्रियत्वाची पायरी लागते. कित्येकांनी पूर्वजन्मींच ही पायरी ओलांडली असेल; पण त्याचें स्वरूप चालू जन्मांत दिसले पाहिजे.
 २५. या एकीकरणाच्या रचनेचा नकाशा धर्मात सांपडणारा आहे.
 २६. एकाच कुलाच्या निरनिराळ्या शाखांचे देव तेच आहेत. या देवांच्या संज्ञा एकच आहेत. बाबिलोनियन कुलाचे 'वेल' देव अथवा हिब्रु कुलाचे
'मोलॉक्स. '
 २७.'देवांचें एकरूप 'बेलमेरोडाक' या देवांत व्हावें याबद्दल बावि- लोनियनांचे प्रयत्न आणि त्याचप्रमाणे सर्व 'मोलॉक्स' चें 'यावा' किंवा 'याहू' या देवांत रूपांतर करण्याबद्दल इझरलाइट लोकांचे यत्न.
 २८. इराणी व हिब्रु लोकांकडून. बाबिलोनियनांचा नाश. त्यांनी बाबिलो- नियन पुराणें आपली केलीं; आणि स्वतःला योग्य असे त्यांचे रूपांतर करून शुद्ध एकेश्वरी धर्म निर्माण केला.
 २९. ज्याप्रमाणे एकसत्ताक राज्यपद्धति हुकुमाची अंमलबजावणी जारीनें करते, त्याचप्रमाणें एकेश्वरी धर्मही एकीकरणाचें काम आवेशानें करतो; पण त्याची वाढ अल्पवयांत खुंटते, आणि त्यापासून पुढें क्रौर्य आणि छळ कर-