पान:विवेकानंद.pdf/269

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आर्यावर्ताचा जगाला संदेश.

२५९


आणि वाकीच्या सामान्य समूहास त्यांनी तसेच कुजत पडूं दिल्यामुळे, त्यांच्या वाढीचा मार्ग बंद झाला. शेवटीं प्रमुख शाखेतील जोमही कालांतरानें कमी होत गेला आणि तिची जागा भरून काढण्याची हिंमत कोणत्याच शाखेच्या अंगीं नसल्यामुळे, हा अत्यंत विशाल आणि बाह्यतः अभेद्य दिसणारा डोल्हारा कोसळून पडला. उदाहरणार्थ, ग्रीस, रोम, नॉर्मन.
 ९. एकभाषा ही एक सोयीची बाब आहे हें खरें; पण त्यालाही वरील आक्षेप आहेच. बाकीच्यांचा जोम नष्ट होईल ही भीति येथेही आहेच.
 १०. अशा अनेक प्रकारच्या भानगडींत सोयीचा एकच मार्ग आहे. सर्वाना पवित्र वाटेल अशी महाभाषा तयार करणे आणि बाकीच्या भाषा त्याच भाषेच्या शाखा म्हणून जगविणे. संस्कृत भाषेनें हेच कार्य केलें.
 ११. द्राविडी भाषांचा उगम संस्कृतांतून झाला असेल अगर नसेल, पण त्यांचे चालू व्यवहार्यरूप अशा प्रकारचें झालें आहे हे मात्र खरें. हळु हळु त्या आपल्या मूळ ध्येयाकडे एकसारख्या धांवा घेत असूनही स्वत्वाचें रक्षण त्यांनीं आजपर्यंत केले आहे.
 १२. मूळ समानकुलत्व शोधून काढणें. ही शाखा म्हणजे आर्य.
 १३. मध्य आशियांत बाल्टिक समुद्रापर्यंत आर्य या नांवाचें अगदीं निराळें असे मानवकुल होतें कीं काय याबद्दल भवति नभवति.
 १४. हा अमुक कुळाचा नमुना म्हणून ज्या शाखा दाखविण्यांत येतात, ते नमुने अगदीं शुद्ध राहिले आहेत की काय ? शाखा सदोदित मिश्र होत्या.
 १५. गौरकुल आणि कृष्णकुल.
 १६. ऐतिहासिक कल्पना सोडून सामान्य मनुष्याच्या दृष्टीने व्यवहार्य- रूपाचा विचार. आर्यांच्या पुरातन ग्रंथांवरून त्यांची वसति तुर्कस्थान, पंजाब व वायव्य-तिबेट यांच्या दरम्यान होती.
 १७. यांत अनेक शाखा आणि उपशाखा असल्यामुळे त्यांच्या एकीकरणाचा यत्न झाला. या शाखा आणि उपशाखा यांची संस्कृति निरनिराळ्या परि-- माणांची होती.
 १८. ज्याप्रमाणे संस्कृत हें भाषेच्या सामान्य पायाच्या जागीं आलें, त्याच प्रमाणे आर्य हें कुलत्वाच्या सामान्य पायाच्या जागीं आलें; आणि याच रीतीनें